आजपासून दिवसाआड जीवनावश्यक वस्‍तूची होणार विक्री

आजपासून दिवसाआड जीवनावश्यक वस्‍तूची होणार विक्री


जिल्‍हाधिकारी यांचे नव्याने आदेश


हिंगोली -  जिल्‍ह्‍यात रविवारपासून (ता.१०) एक दिवसाआड भाजीपाल्यासह जिवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याचे नवीन आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले असून आता पुर्वीच्या सकाळी नऊ ते एक यावेळे ऐवजी आठ ते एक यावेळात ते सुरू राहणार आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यापुर्वी किराणा माल विक्री करणारे दुकाने भाजीपाला विक्री सुरू करण्याचा सुचना निर्गमीत करण्यात आल्या होत्या. त्‍यानुसार किराणा, भाजीपाला, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्‍वीटमार्ट, संबधीत दुकाने सकाळी नऊ ते एक या वेळात सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता यात नव्याने बदल करून या दुकानाची वेळ सकाळी आठ ते एक अशी करण्यात आली असून नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेवर भाजीपाला विक्री केली जाणार आहे. 


दरम्‍यान, एक दिवसाआड भाजीपाला व जीवनावश्यक वस्‍तू  विक्रीची दुकाने रविवार (ता.10). मंगळवार (ता.12), गुरूवार (ता.14) व शनिवार (ता.16) सकाळी आठ ते एक या वेळात सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. यासाठी दिलेले नियम व अटीचे काटेकोरपणे अमंलबजावणी करावी असे कळविण्यात आले आहे. तसेच इलेक्‍ट्रीक व स्‍टेनशनी सामानीची दुकाने देखील नवीन वेळापत्रकाने दिलेल्या वेळतच सुरू राहणार आहेत.


Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा