Posts

Showing posts from June 22, 2020

राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार करा - निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी

राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार करा निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचे कंपनीच्या मॅनेजरला तंबी हिंगोली - जिल्ह्यात१६१ व अन्य राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून ती दर्जेदार व लवकरात पूर्ण करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संबंधित महामार्गाच्या व्यवस्थापकाला दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (ता.२२) महामार्गाच्या व्यवस्थापकाची बैठक घेण्यात आली यावेळी सूर्यवंशी यांनी चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन व्यवस्थापकांना वेळेत दर्जेदार  कामे पूर्ण करण्याचे आदेश ठोठावले आहेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बर्गे,खनिकर्म अधिकारी कळसकरआदींची उपस्थिती होती. सूर्यवंशी पुढे म्हणाले ,जिल्ह्यात विविध कंपनी कडून राष्ट्रीय महामार्गाची कामे हाती घेण्यात आले असून ही कामे चांगले व दर्जेदार करावी तसेच गौण खनिजांची रॉयल्टी तातडीने भरणा करावी. रॉयल्टी भरणा न केल्यास आपल्यावर कारवाई करण्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.  जिल्ह्यात सेनगाव-रिसोड मार्गावर केलेल्या कामावर तडे पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बोगस कामे करू नका, असा इशारा व्यवस्थापका...

लाच स्विकारणा-या उपव्यवस्थापकास अटक 

लाच स्विकारणा-या उपव्यवस्थापकास अटक  परभणी, दि.22(प्रतिनिधी)-   येथील वीज वितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक यांना दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी सोमवारी(दि.22) मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.  एका तक्रारकर्त्याने 12 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात स्वतः एक तक्रार दाखल केली. त्यातून आपण 28 वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालो. त्याचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे क्लेम करिता संबंधीत कर्मचारी लाच मागत असल्याचे नमुद केले. या खात्याच्या अधिका-यांनी लगेच सापळा रचला अन् पंचासमक्ष वीज कंपनीच्या मानव संसाधन विभागात(क्रमांक 2) केलेल्या कारवाईत तक्रारकर्त्यांकडून उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक हे दोन हजार रूपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.  दरम्यान, पोलिस निरीक्षक अमोल कडू, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमिल जहागीरदार, मिलिंद हनुमंते, शेख शकील, शेख मुखीद, माणिक चट्टे, स...

सेनगावच्या विवाहितेचा विष प्राशनानंतर परभणीत मृत्यू

सेनगावच्या विवाहितेचा विष प्राशनानंतर परभणीत मृत्यू                 जाचास कंटाळून संपविले, सासरच्या मंडळींवर गुन्हा    परभणी , दि.21  (प्रतिनिधी)- मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तसेच हुंडयातील 3 लाख़ रुपयांच्या रक्कमेच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळास कंटाळून सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा येथील विवाहितेने विषारी औषध पिले. परभणीत उपचारा दरम्यान या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून येथे दाखल झालेला गुन्हा सेनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.  धर्मापुरी(ता.परभणी) येथील दुर्गा गाडगे हिचा विवाह चिंचखेडा येथील ज्ञानेश्‍वर गाडगे याच्याशी 2015 मध्ये झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्याच्या मागणीसाठी छळ सुरू केला होता. मुलबाळ होत नसल्याचे कारण समोर करीत सासरची मंडळी तिला वारंवार मारहाण करणे, उपाशीपोटी ठेवणे आदी प्रकार करीत होती, असे तिचे वडील रामा बापूराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिचा पती ज्ञानेश्‍वर गाडगे, सासू सत्यभामा गाडगे, सासरा दादाराव ग...

आजचा दिवस दिलासादायक :- 01 च भिसे वाघोलीचा रुग्ण

दिनांक 22.06.2020   लातूर 61  पैकी 48 निगेटिव्ह 01 पॉझिटिव्ह 03 Inconclusive 08 रद्द व 01 प्रलंबित विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 17 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  03 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती 65 वर्षे वयाची असून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील  आहे  अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.                                                                                                                                     ...

हिंगोलीत अकरा योध्याचा कोणावर विजय

Image
हिंगोलीत अकरा योध्याचा कोणावर विजय आता बाधीत रुग्णांची संख्या १७ वर ,जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल हिंगोली -  येथील जिल्‍हा सामान्य रुग्णांलयात सहा, वसमत येथील एक व कळमनुरी येथील चार असे एकूण अकरा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्‍ह्‍यात 17 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सोमवार (ता.22) दिली.  हिंगोली येथील जिल्‍हा सामान्य रुग्णांलयातील आयसोलेशन वार्डातील सहा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. यात चार पेन्शनपुरा येथील एक भोईपुरा तर एक कमलानगर येथील रहिवासी आहे. वसमत येथील अशोक नगर येथील एक, कळमनुरी केअर सेंटर येथील चार रुग्णात तीन दाती तर एक रुग्ण डोंगरकडा येथील आहे. ते बरे झाल्याने एकूण अकरा रुग्णांना आज  डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.  आजपर्यत जिल्‍ह्‍यात एकूण 240 रुग्ण झाले आहेत त्‍यापैकी 223 रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 17 रुग्णावर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्‍ह्‍यात लागण झालेले व उपचारसाठी कोरोना केअर स...

हिंगोलीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण तर दोघांना डिस्चार्ज

Image
हिंगोलीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण तर दोघांना डिस्चार्ज हिंगोली -  कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथील दोन मुलींना  कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून या दोन्ही मुली काझी मोहला येथील रहिवासी आहेत.पॉझिटिव्ह महिला नांदेड येथे भरती असून तिच्या या नाती आहेत.सदर महिलेच्या संपर्कातील पंधरा जणांचे नमुने तपासणी साठी पाठविले असूनत्यापैकी दोन पॉझिटिव्ह, दोन राखीव, तर चार कॅन्सल झाले आहेत. यातील सात निगेटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. सदरील रुग्ण हा खानापूर येथील रहिवासी आहे.तसेच वसमत येथील कुरेशी मोहला येथील एक रुग्ण बरा झाला आहे. आज रोजी दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आणि नव्याने दोन लहान मुलींना कोरोनाची लागण  झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात २४० कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण २८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्हानंतर्गत कोविडची लागण झालेल्या कोरोना केअर सेंटर येथे उपचार सुरु असलेल्या मध्ये वसमत येथे एकूण ती...