लातूर जिल्ह्यात 07 पॉझेटिव्ह, 03, उदगीर - एकुर्गा 01, औसा 01
लातूर 127 पैकी 112 निगेटिव्ह 07 पॉझिटिव्ह 08 Inconclusive दि.18 जून 2020 *लातूर जिल्ह्यातील 127 पैकी 112 निगेटिव्ह, 07 पॉझिटिव्ह व 08 अनिर्णित* *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 67, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 139 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11* *आज विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतून दोन रुग्णांना प्रकृती बरी झाल्याने सुट्टी* लातूर, दि.18(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत एकूण 127 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 112 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 08 व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत आहेत. 127 स्वाब पैकी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे. *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून एक व्यक्ती सुतमि...