Posts

Showing posts from April 23, 2020

कोराणामुळे कित्येक नवरदेवांचे लग्न लांबणीवर.... हळदी ऐवजी सँनिटायझर व मास्क लावायची वेळ.

Image
....   प्रतिनिधी/ शरद राठोड    कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने संबंध जगाला वेठीस धरले आहे. या संसर्गजन्यच्या वाढत्या आजारामुळे प्रशासनसह विविध स्तरावर निर्बंध घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसत आहे.या कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकड्यामुळे ज्या मुलांची शुभमंगल सावधान होणार होती,अशा मुलांचे स्वप्न सध्या तरी या आजाराने भंग केल्याचे दिसुन येत आहे.   दरवर्षी ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लग्नाची रेलचेल वाढलेली आपण पाहतो.ऊन्हाळ्याची सुट्टी लागली की,लग्नाच्या बोलणीला सुरुवात व्हायची.परंपरेनुसार लग्नाच्या गाठी जरी परमेश्वरानी बांधल्या असतील तरीही देवबाप्पाच्या मदतीने सुपारी फोडण्यापासुन ते शेवटच्या फेरेपर्यंत संसाराची मुहूर्तमेढ ओढली जायची.  त्यामुळे मजल दर मजल करत कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव पाहता होणारे भावी नवरदेव यांना सध्या तरी हळद लावण्याऐवजी सँनिटायझर लावण्याची वेळ आलेली दिसून येत आहे.  यावर्षी कित्येक नवरदेव ऊन्हाळ्यात आपले लग्न होणार या आशेवर वाट पाहत बसले होते.अशा सर्व नवरदेवाला हळद लावण्याऐवजी घरांतून बाहेर ये-जा करतांना सँनिटायझर लावावे ...

तलावात बुडून दोन सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू

Image
तलावात बुडून दोन सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू     हट्टा पोलिस घटनास्थळी  दाखल    औंढा नागनाथ -  तालुक्यातील नागेशवाडी येथे दोन सख्या भावाचा तलावात बुडून मृत्‍यू झाल्याची घटना गुरूवारी  सकाळी नऊ वाजता घडली असून घटनास्‍थळी हट्टा पोलिस दाखल झाले आहेत.    या बाबत अधिक माहिती अशी की, औंढा तालुक्‍यातील   नागेशवाडी येथील गणेश नाईक हे बऱ्याच  दिवसापासुन आपल्या कुटुंबाना घेवुन शेतातच राहतात.त्यांची शेती तळ्याच्या काठावर असून बाजुलाच  आखाडा आहे. येथे ते राहतात गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या घरातील कुटूंबीय कपडे धुण्यासाठी तलावावर गेले असता त्‍याची दोन मुले सर्जेराव व धृपत हे पोहण्यासाठी तलावात उतरले व त्यानंतर या मुलांना तलावाच्या बाहेर येता आले नाही तलावात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.    त्यानंतर आरडाओरडा झाल्याने  बाजुच्या शेतामधील लोकांनी तलावाकडे धाव घेतली व या दोन मुलांना तलावातून बाहेर काढले. मयतमध्ये सर्जेराव गणेश नाईक (वय 12), धृपत गणेश नाईक (वय सात) या दोघां सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघां...

सारीनेच झाला त्या व्यक्तीचा मृत्यू हिंगोलीकरांनी सोडला सुटकेचा श्वास

सारीनेच झाला त्या व्यक्तीचा मृत्यू हिंगोलीकरांनी सोडला सुटकेचा श्वास   हिंगोली- महिना भरापूर्वी मुंबईवरून हिंगोली जिल्ह्यातील एकांबा येथे आपल्या गावी पोहोचलेल्या व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोना नसून सारी या आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले होते.  तसेच त्या रुग्णासह त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा आज कोरोना अहवाल हा निगेटिव्ह प्राप्त झाल्याने, हिंगोलीकरांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.    खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्यपथक व पोलीस प्रशासनाने एकांबा येथे भेट देऊन मयताच्या शेजाऱ्यांची नोंद घेतलेली होती. कधी नव्हे ते पथक वारंवार गावात येत असल्याने, सर्वांचेच लक्ष अहवालाकडे लागले होते. जिल्ह्यातील एकांबा येथील व्यक्ती हा मुंबई येथे मंत्रालयात कार्यरत आहे. कोरोनामुळे मनुष्यबळ कमी केल्याने तो आपल्या मूळगावी परतला होता. तो आला तेव्हापासून घरातच अलगिकरण कक्षात राहत होता. मात्र दोन दिवसांपासून अचानक ताप येत असल्याने, तो खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथे उपचार घेतल्यानंतरही ताप काही केल्या कमी होत...