चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा नव्याने पाच रुग्ण वाढले
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा नव्याने पाच रुग्ण वाढले, तर तीन रुग्ण निगेटिव्ह हिंगोली,- सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे क्वारंटाइन केलेल्या पाच व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी रात्री दहा वाजता प्राप्त झाला आहे.तर तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली. सेनगाव येथे दिल्ली, मुंबई येथून रुग्ण आले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील एका२१ वर्षीय तरुणीचा कोरोनाने अकोला येथे मृत्यू झाला. सदरील युवतीला मधुमेहाचा आजार होता. आणि तिला बाहेर गावावरून येण्याचा पूर्व इतिहास नव्हता. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने सम्पूर्ण केंद्रा बुद्रुक गावाचे सर्वेक्षण केले असून सदर मुलीच्या संपर्कातील ४३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगून रविवारी ४३ पैकी ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर दोघांचे अहवाल रिजेकट ...