तिघांना कोरोनाची लागण, तर आठ रुग्ण निगेटिव्ह
कतार राष्ट्रातून परतलेल्या तरुणासह अन्य तिघांना कोरोनाची लागण, तर आठ रुग्ण निगेटिव्ह बाधीत रुग्णसंख्या पोहचली ३३ वर हिंगोली - कतार राष्ट्रातून औंढा तालुक्यात परतलेल्या एका२६ वर्षीय क्वारंटाइन सेंटर येथे भरती केलेल्या तरुणासह कळमनुरी येथील दिल्ली येथून परतलेल्या एकासह दोन एसआरपीएफ जवान असे एकूण चार जनाला बुधवारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता रुग्ण संख्या३३ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. कतार देशातून औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे परतलेल्या एका तरुणाला क्वारंटाइन सेंटर येथे भरती करून उपचार सुरु होते. आज त्याचा स्वाब नमुना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिल्ली वरून कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथे परतलेल्या २७ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याने त्यास उपचार सुरु केले आहेत. तसेच मुंबईवरून बंदोबस्ता वरून परतलेल्या ९२ जवानाना एलकी येथील एसआरपीएफ इमारतीत क्वारं टाइन केले होते.९२ पैकी ८८ जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर दोन...