Posts

Showing posts from June 16, 2020

लातूर 02, उदगीर 05, निलंगा 01, औसा 02 अहवाल पॉझेटिव्ह

Image
दिनांक 16.06.2020  9.20 PM  लातूर 93 पैकी 81 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 20 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती जुनी कापड लाईन, लातूर येथील असून त्यांचे वय 22 वर्ष दुसरी व्यक्ती  आंधोरा ता. औसा येथील असून त्यांचे वय 55 वर्षे आहे    दिनांक 15.06.2020 रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.   उदगीर  -  नूर पटेल कॉलनी 01,नोबेल कॉलनी 01,  किणी येल्ला देवी येथील 03 आहेत ते विकास नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत. उमापूर जी. बिदर, कर्नाटक  राज्य येथील 02 रहिवासी वय 21 व 30 वर्षे यांची  दिनांक 29.05.2020 रोजी उमापूर येथून तपासणी करण्यात आली होती दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांची दिनांक 15.06.2020 रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते पूर्णपणे ...

मुंबई नंतर आता पुणे कनेक्शन ; वसमत तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा

मुंबई नंतर आता पुणे कनेक्शन ; वसमत तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा बाधीत रुग्णसंख्या पोहचली ३७  वर हिंगोली -  पुण्यातून वसमत तालुक्यात परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.१६) जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त झाला आहे. हा रुग्ण तालुक्यातील मुरुम्बा गावातील रहिवाशी असून त्यास आल्यानंतर क्वारंटाइन सेंटर मध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीनिवास यांनी सांगितले. आतापर्यन्त जिल्ह्यात २२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९२ रुग्णावर उपचार केल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ३७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. आजपर्यत कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये तीन रुग्ण आहेत. यात एक कुरेशी मोहल्‍ला, एक अशोकनगर,व मुरुम्बा एक  येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे पाच कोरोना रुग्ण आहेत .यात जाम येथील एक, दाती तीन, तर एक डोंगरकडा येथील आ...

जिल्‍ह्‍यात २२ हजार शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप

Image
जिल्‍ह्‍यात २२ हजार शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप जिल्‍हाधिकारी रचेश जयवंशी यांनी जनेतेशी साधना संवाद हिंगोली -  जिल्‍हा कृषी प्रधान असून शेतीवर अधारीत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधीक आहे. २ लाख ६० हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे. त्‍यामुळे खते बियाणाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध बसून आतापर्यत २२ हजार ७७८ शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बांधावर खताचे वाटप केले असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवार (ता.१६) जनेतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.   जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना ते म्‍हणाले जिल्‍ह्‍यात सर्वाधीक क्षेत्र सोयाबीन पीकाचे असून २ लाख ६०हजार हेक्‍टरवर पेरणी केली जाणार आहे. त्‍याखालोखाल तूर 52 हजार हेक्‍टर तर कापूस 45 हजार हेक्‍टरवर लागवड केली जाणार असून यासाठी लागणारा खाताचा व बियाणाचा पुरवठा मुबलक प्रमाणात कृषी विभागाने शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिला असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यानी बाहेरील कंपनीच्या बियाणावर भर न करता स्‍वतःकडील बियाणाचा वापर करावा ते अधिक फाय...