हिंगोलीत बनावट नोटा सापडल्या, कारखान्यावर पोलिसांचा छापा ,आरोपीना अटक
हिंगोलीत बनावट नोटा कारखान्यावर पोलिसांचा छापा ,आरोपीना अटक लाखो रुपयांच्या नोटासह साहित्य जप्त ,हिंगोली पोलिसांची कारवाई हिंगोली - ग्रामीण हद्दीत बनावट नोटा तयार करून बाजारात चलनात आणली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून लाखो रुपयांचा माल व साहित्य जप्त करून आरोपीना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. येथील ग्रामीण उपअधीक्षक कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक रामेश्वर वैन्जने, सपोनि ओमकांत चिंचोळकर, आदींची उपस्थिती होती. यावेळी योगेशकुमार म्हणाले, शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आनंदनगर भागात बनावट नोटा छापण्याची गुप्त माहिती मिळाल्याने अरूण हनवते यांच्या घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम व त्याचे सोबत एक महिला व इतर साथीदार मिळुन ते बनावट नोटा छापुन प्रिंट करून स्वतः च्या फायदयासाठी त्या नोटा बाजारामध्ये चलनात आनत आहे . तसेच स्वत : जवळ घरात बाळगुन आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ...