धनवान रणबावळे यांचे निट परीक्षेत घवघवीत यश, बहुजन टायगर क्रांती सेनेच्या वतीने सत्कार
धनवान रणबावळे यांचे निट परीक्षेत घवघवीत यश बहुजन टायगर क्रांती सेनेच्या वतीने सत्कार सेनगाव - सेनगाव येथील डॉ .माधव रणबावळे यांचे चिरंजीव धनवान रणबावळे यांनी मागील झालेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत ७२० पैकी ५१५ गुण मिळवीत घवघवीत यश संपादित केल्याने बहुजन टायगर क्रांती सेना या सामाजिक संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्यात राज्यात नीट वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत सेनगाव येथील मातंग समाजातील विद्यार्थी धनवान माधवराव रणबावळे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत ७२० मार्क पैकी ५१५ गुण घेत त्यांनी यशाचे शिखर गाठले असून भावी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न सुकर केले आहे. या तरुणाने नीट वैद्यकीय परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे बहुजन टायगर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे , तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्काराचे आयोजन करून त्यांचा निवासस्थानी जंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सुतारे...