भाजपचे एक आगस्ट पासून राज्यभर दूध एल्गार आंदोलन
भाजपचे एक आगस्ट पासून राज्यभर दूध एल्गार आंदोलन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन हिंगोली - गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान तर दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान आशा विविध मागणीसाठी आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे एक आगस्ट रोजी राज्यभर दूध एल्गार आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन सोमवारी( ता.२०) निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, दुधविकास मंत्री यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव ,आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,के. के. शिंदे, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, राजू पाटील, ओम कोटकर आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष ऍड. जाधव पत्रकारांना माहिती देताना म्हणाले ,एक आगस्ट पासून संपूर्ण राज्यभर दुध एल्गार आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारच्या हलगर्जी पणामुळे किंवा निष्काळजी पणामुळे कंपन्या शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन चे बियाणे देऊन फसवणूक केली असताना सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करीत,शेतकऱ्यांनी पेरणी केलेले ...