Posts

Showing posts from April 10, 2020

आमदार रोहित पवाराकडून हिंगोलीला ५०० लिटर सॅनिटायझर 

Image
आमदार रोहित पवाराकडून हिंगोलीला ५०० लिटर सॅनिटायझर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा पाठपुरावा  हिंगोली -  जिल्ह्यात सानिटायझरचा तुटवडा निर्माण झाल्याने  कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे सानिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याला बारामती ऍग्रो तून ५०० लिटर सानिटायझर मोफत उपलब्ध करून दिले .त्यानंतर सानिटायझर थेट जिल्हाधिकारी  जयवंशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्या व्यक्ती पासून संक्रमण टाळण्यासाठी जिल्ह्यात सानिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे जिल्ह्याला सानिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बारामती अॅग्रोच्या वतीने हिंगोली जिल्ह्यासाठी ...

परिवर्तनवादी महापुरुष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले   

Image
  हिंगोली - असेच रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक दोन मारेकरी घराचा दरवाजा ठोठावतात?आणि आणि घरामध्ये आल्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला आता ठार मारणार?तुम्हाला मारण्याची आम्ही सुपारी घेतली आहे,तुम्ही लोकांनी धर्म बुडविला आहे?तेव्हा तुम्हाला जगण्याच्या अधिकार नाही असे जोर जोराने ते मारेकरी बोलत होते.   तेव्हा माझा गुन्हा तरी काय आहे? मला मारून तुम्हाला काय मिळणार?तुमच्या मुलाला पुढील शिक्षणासाठी दारे बंद करायची असतील?आणि मला मारल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर तर खुशाल मारा? पण मारण्याअगोदर तुम्ही माझ्याइथे आलात तर दोन घास जेवण करून मग मला मारा?  असे शब्द कानी पडताच त्या दोन मारेकऱ्यांनी हात पाय जोडले व आम्हाला माफ करा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. आता आम्ही तुम्हाला नाही मारणार, पण ज्यांनी तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला सुपारी दिली त्यांना नक्कीच मारणार? तेव्हा थांबा अस करू नका त्यांनी तुम्हाला सुपारी दिली तो त्यांचा धर्म पण तुम्ही उलट त्यांना मारणे हा तुमचा धर्म होऊ शकत नाही. असे परिवर्तनवादी विचार सांगणारे आणि शिक्षनाची खरी व्याख्या सांगणारे खर आणि खोट यातील फरक ओळ...

हरियाणातून दिलेल्या पास प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Image
  आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा यशस्वी    औसा /प्रतिनिधी:हरियाणातून आंध्रप्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना पास उपलब्ध करून दिल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशांपैकी ८ जण कोरोना बाधित असल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आ.अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. तो यशस्वी झाला असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे .  हरियाणातील झिरका या उप विभागातून १२ प्रवासी आंध्रप्रदेशकडे जाण्यासाठी निघाले होते .या प्रवाशांकडे तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला पास होता.त्या आधारावर प्रवास करत हे प्रवासी निलंगा येथे पोहोचले. तेथे त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता  १२पैकी ८ जण कोरोना बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर याप्रकरणी पास देणाऱ्या त्या  उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आ.अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती .या मागणीची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रवाशांना घेऊन हरियाणातील एका पंचायत ...

आखाडा बाळापूर येथे स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल

Image
  आखाडा बाळापूर  - येथे शिधापत्रिकाधारकांना जादा दराने धान्य वाटप करणे तसेच शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप न करता मोघम स्वरुपात धान्य वाटप केल्याच्या आरोपावरून एका स्वस्त धान्य दुकानदारा विरुध्द जिवनावश्‍यक वस्तुंचा काळाबाजार करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१०) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोध सुरु केला आहे.   आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार ओमप्रकाश ठमके हे  शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या नियमानुसार व योग्य दराने धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार वंचीत बहुजन आघाडीचे राजू कांबळे, माणिक पंडीत यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे दुरध्वनीवरून केली होती. त्यावरून आज आज तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मंडळ अधिकारी आनंदराव सुळे यांनी दुकानास भेट देऊन चौकशी केली. यावेळी चौकशीमध्ये दुकानदाराच्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये यामध्ये ई पॉस मशीनमधून काढलेल्या अनेक पावत्या दुकानातच फेकून दिल्या होत्या तर दुकानातील रजिष्टरवर केवळ लाभार्थ्यांचीच नांवे लिहीण्यात आली होती. त्यांना नेमके किती धान्...