Posts

Showing posts from July 3, 2020

हिंगोली : अंकुर सिडच्या व्यवस्थापकासह एकावर गुन्हा दाखल

अंकुर सिडच्या व्यवस्थापकासह एकावर गुन्हा दाखल सेनगाव-  सोयाबीनची उगवण क्षमता कमी असताना देखील उगवण क्षमता अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे बियाणे वितरण केल्या प्रकरणी नागपूर येथील अंकुर सिड्सच्या व्यवस्थापकासह एकावर सेनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची घाई असते. आशा वेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जिल्ह्यात अवतरतात आणि शेतकऱ्यांना आपली बियाणे चांगली असून अधिक उगवण शक्ती असल्याच्या थापा मारतात यात शेतकरी बळी पडतो. अशाच एका नागपूर येथील मे अंकुर सिडस प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक व रविंद्र बोरकर यांनी सेनगाव पंचायत समिती आवारात ता.३०जून रोजी  येऊन आमच्या कंपनीचे सोयाबीन उगवण क्षमता कमी असतानाही उगवण क्षमता जास्त असल्याचे दाखवून निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून पोबारा झाले. इकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अंकुर सोयाबीनचे सिडसची पेरणी करून देखील बियाणे आजपर्यंत उगवले नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून आ...

लातूर 03, औसा 02, निलंगा 02उदगीर 01,  तर उस्मानाबाद 07 रुग्ण पॉझेटिव्ह  

Image
दिनांक 03.07.2020 लातूर 03, औसा 02, निलंगा 02, उदगीर 01,  तर उस्मानाबाद 07 रुग्ण पॉझेटिव्ह   लातूर  213  पैकी 187 निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह 09 Inconclusive व 01 रद्द  व 08 प्रलंबित विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 25 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून 61 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 25 रुग्ण दाखल असून 05 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 36 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.  आज 04 रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 03 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते एक रुग्ण 13 दिवस व्हेंटिलेटरवर होता. व दूसरा रुग्ण 10 दिवस अतिदक्षता विभागात होता व उर्वरीत एक रुग्ण 04 दिवस व्हेंटिलेटरवर होता व...

परभणीत कोरोनाबाधीत 6 रुग्ण

Image
परभणीत कोरोनाबाधीत 6 रुग्ण आढळले, नाथनगरात एकूण दोन रुग्ण  परभणी, दि.03(प्रतिनिधी)-  शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून  दिवस्दिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.तीन) सायंकाळी कोरोनाबाधित एकूण 6 रूग्ण आढळून आले आहेत. त्यात परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागात एक, नाथनगरात दोन, अजिजीया नगरात एक, पंचशील नगरात एक व विकास नगरात एक असे एकूण परभणी शहरात 6 संशयित रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.  जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत त्या प्रयोग शाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबीत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून 6 एवढया संशयितांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 129 एवढी झाली आहे.  दरम्यान, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महसुल विभागात दिवस्दिवस वाढणा-या रुग्णांच्या संख्येने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच...

हिंगोली : जीपत  तिनही विषय सभापतींच्या निवडी बिनविरोध,

Image
जीपत  तिनही विषय सभापतींच्या निवडी बिनविरोध शिक्षण रत्नमाला चव्हाण तर कृषी व पशुसंवर्धन बाजीराव जुमडे ,आरोग्य, बांधकाम मनीष आखरे यांची वर्णी हिंगोली - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची शुक्रवारी( ता.३)तहकूब विशेष सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत विषय सभापती पदाच्या निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली शिक्षण सभापती पदी रत्नमाला चव्हाण तर कृषी व पशु संवर्धन सभापती पदी बाजीराव जुमडे यांची आरोग्य, बांधकाम मनीष आखरे  यांची बिनविरोध निवड प्रक्रिया झाली. येथील जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात शुक्रवारी(ता.३) जिल्हा परिषदेची तहकूब झालेली विशेष सर्व साधारण सभा  जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली.यावेळी व्यास पिठावर उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ राधाबीनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी आदींची उपस्थिती होती. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन ,संचारबंदी लागू करण्यात आली.त्यामुळे तब्बल पाच महिन्य...

हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालय शील

Image
हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालय शील अपडाऊन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने इतर दहा कर्मचारी विलगीकरण कक्षात हिंगोली  - येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील एका अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्याला परभणी येथे कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा समान्य रुग्णालयाकडे प्राप्त होताच शुक्रवारी धर्मदाय आयुक्त कार्यालय शील करून येथील दहा कर्मचाऱ्यांना अंधारवाडी येथील मुलांचे वसतिगृहात विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती डॉ. जाफर यांनी दिली. येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये बारा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये  काही कर्मचारी परभणी येथून ये -जा करतात. चार ते पाच दिवसापूर्वीच परभणी येथून ये-जा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे वडिल परभणी येथे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परभणीच्या आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल परभणीच्या शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. यामध्ये हिंगोली येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती हिंगोलीच्या आरोग्य विभागाल...