माहेरी आलेल्या लेकीला परिस्थितीने मारले,पण भादेकराच्या माणुसकीच्या आधाराने तारले!
कोरोनाच्या भीतीने आसऱ्याच्या शोधात औसा- कोरोनाच्या भीतीने आसऱ्याच्या शोधात आलेली माहेरवाशिन घरच्यांनी शेतात हाकलले अन तिला चरितार्थ चालविण्यासाठी भादेकर यांनी रेशनचा आधार देऊन जगण्यासाठी मदत करून तारल्याची मानवीय घटना येथे घडली. औसा तालुक्यातील भादा येथे सध्या चीन निर्मित कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून गावोगावी याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. या दक्षतेमुळे प्रत्येक गावातील नागरिकही दक्ष असल्याचे दिसून येत आहे कारण सदरील मुलगी ही भादा येथील आई-वडिलांच्या घरी आली असता आई-वडिलांनी ग्रामपंचायतच्या सूचना आणि गावकऱ्यांची भावना सांगून तिला शेतात राहण्यास पाठविले परंतु आर्थिक परिस्थिती घरची बेताची असल्याने शेतात तिला खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामपंचायत व गावकरी यांनी जाऊन शेतामध्ये खाण्यासाठी आवश्यक ती मोजकी सामग्रीची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शनही अशा विपरीत परस्थितीत दिले. पुणे येथे कृष्णा हॉटेलमध्ये आचारीचे काम करणारे लक्समन गायकवाड,कात्रज येथील असून हे मुलाच्या लग्नासाठी गावाकडे आले असता काही दिवस गावीच राहिले ...