विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील पिंपळदरी येथील प्रकार
विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील पिंपळदरी येथील प्रकार विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील पिंपळदरी येथील प्रकार हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे सौभाग्य योजने अंतर्गत भिंतीवर मिटर बसवून जोडणी न देताच ९० ग्राहकांना हजारो रुपयांची देयके माथी मारण्यात आली असून त्यांना थकबाकीदार दाखवत गावाचा आठ दिवसापासून विज पुरवठा बंद केल्याने अनेक अडचणी येत आहेत. सध्या बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. पिंपळदरी येथे शासनाच्या सौभाग्य योजने अंतर्गत ९० ग्राममस्थांच्या घरी भिंतीवर मिटर बसविण्यात आले आहेत. मात्र या ग्राहकांना विज वितरण कंपनीने विज जोडणी मात्र दिली नाही. आता मिटर बसले विज देखील सुरू होईल अशी अपेक्षा करून हे ग्रामस्थ घरात विजेचा प्रकाश कधी होईल याची वाट पाहत होते. त्याला बराच कालावधी देखील झाला त्यांनी संबधीताकडे अनेक वेळस या बाबत चौकशी केली आज उद्या बसेल असे सांगत वेळ मारून नेण्यात येत होती. दरम्यान, विज वितरण कंपनीने सौभाग्य योजनेत मिटर बविलेल्या ९० नागरीका...