Posts

Showing posts from February 24, 2020

जिल्हा परिषदेतील महिला कक्ष कुलूपबंदच! वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

Image
  हिंगोली - जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील महिला कक्षाला कुलूप ठोकल्याने कार्यालयातील व कामकाजनिमित्य येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुन्हा महिला कक्ष सुरु करण्याची मागणी होत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.     येथील जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या पुढाकारातून कार्यालयातील महिला कर्मचारी,कामानिमित्य येणाऱ्या महिलांच्या लहान बाळाला स्तनपान करण्यासाठी मागील तीन वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांच्या प्रयत्नातून शेष फंडातून या महिला कक्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या कक्षाचा उपयोग गरोदर माता, किंवा स्तनदा मातांना होत नसून,मध्यन्तरी केवळ जेवण करण्यासाठी या कक्षाचा वापर कर्मचारी वर्गातून केला जात होता. परंतु काही वर्षांपासून हा कक्ष कुलूप बंद अवस्थेत धूळखात पडला असून, या कडे संबंधित विभागाचे तरी सोडा वरिष्ठ अधिकारी यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याने या महिला कक्ष कशासाठी स्थापन केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कक्षा समोर कचऱ्याचे ढिगारे पडल्याने पुन्हा जिल्हा परिषदेच्य...

महात्‍मा फुले कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू, 233 लाभार्थ्याची यादी प्रसिध्द

महात्‍मा फुले कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू  समगा, खरबी गावातील 233 लाभार्थ्याची यादी प्रसिध्द   हिंगोली ः जिल्‍ह्‍यात महात्‍मा ज्‍योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू झाली असून कर्जखात्याशी आधार जोडणी झाली आहे. हिंगोली तालुक्‍यातील समगा व खरबी गावातील 233 शेतकरी लाभार्थ्याची यादी सोमवारी (ता.24) प्रसिध्द करण्यात आली आहे.    याबाबत या दोन्ही गावात जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसीलदार मधुकर खंडागळे, सहाय्यक निंबधक जिंतेद्र भालेराव यांनी या गावात भेट देवून आधार प्रामाणिकरणाच्या कामकाजाची पाहणी केली. यासाठी तहसील व उपनिंबधक कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.      दरम्‍यान, जिल्‍ह्‍यात महात्‍मा ज्‍योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेत आतापर्यत 1 लाख 5 हजार 690 शेतकऱ्याचे कर्जखात्याशी आधार जोडणी झाली असून त्‍यापैकी 96 हजार 995 शेतकऱ्याची माहिती पोर्टलद्वारे अपलोड करण्यात आली आहे. अद्यापही 3500 शेतकऱ्यांनी विनाविलंब त्‍यांचे ओळखपत्र संबधित बँक शाखेत देवून आधार जो...

पुनर्वसन होईपर्यत जागेवर राहण्याची परवानगी द्या अतिक्रमण धारकांचे निवेदन

पुनर्वसन होईपर्यत जागेवर राहण्याची परवानगी द्या    अतिक्रमण धारकांचे जिल्‍हाधिकाऱ्याकडे निवेदन    हिंगोली -  येथील जलेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याच्या  नावाखाली शासनाकडून होणारी कडक कार्यवाही थांबवावी तसेच तिथे असलेल्या घरातील गोरगरीबांना पर्यायी व्यवस्‍था करून पुनर्वसन करून राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावी तोपर्यत आहे त्‍याच ठिकाणी राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी (ता.24) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.    या बाबत नितीन चौधरी, जितेंद्र देवहंस, रमेश कुरील, ओम कुरील, अनिल कुरील, मल्‍लेश चुन्नमल्‍लु, शाम कुरील, भरत चौधरी आदींनी जिल्‍हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमुद केले आहे की, जलेश्वर तलावाच्या काठावर जवळपाच चाळीस वर्षापासून आम्‍ही वास्‍तव्यास आहोत तिथे असलेल्या घराची नळपट्टी, घरपट्टी, लाईटबील नियमत भरना करतो आमची मुलेबाळे याच घरात लहानाची मोठी झाली आहेत. जलेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली आमच्यावर शासनाने अडचणी आणले आहे.    या प्रकाराकडे लक्ष द्यावे तसेच आमची राहण्याची दुसरी कोणतीच पर्यायी व्यवस्‍था क...

मेघा गुंडेवार यांचे निधन

Image
मेघा गुंडेवार यांचे निधन   हिंगोली -येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त न्यायमूर्ती   सुधाकर दत्तात्रय गुंडेवार हयांच्या पत्नी  मेघा गुंडेवार यांचे रविवारी( ता.२३)  पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले. मृत्य समयी त्यांचे ७१ वय वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना, दीर,नातवंड असा मोठा परिवार आहे.   न्यायमूर्ती सुधाकर गुंडेवार यांचे चिरंजीव अमेरिकेत असून ते  पुणे येथे आल्यावर स्व. मेघा यांच्या पार्थिवावर (ता. २५) फेब्रुवारीला पुणे येथे  अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हिंगोली येथील ज्येष्ठ समाजसेवक शरद गुंडेवार यांचे सुधाकर  गुंडेवार धाकटे बंधू असून तत्कालीन खासदार स्व. विलासराव गुंडेवार यांचे ते चुलत बंधू आहेत.