Posts

Showing posts from May 6, 2020

उदगीर रेड झोन : आत्ताच 7 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  एकूण संख्या 21 झाली

Image
दि. 6 मे 2020   रात्री 10.40  आज उदगीर येथील प्रलंबित 12 अहवाल पैकी 7 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  एकूण संख्या 21 झाले लातूर, दि. 6:- आज उदगीर येथील 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर  पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव आला आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.                **********

GOOD NEWS : -- उदगीर येथील आजचे सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह

Image
उदगीर येथील आजचे सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह   *जिल्ह्यात एकूण  कोरोना पॉझिटिव्ह  च्या 14 ऍक्टिव्ह केसेस                      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज  एकुण  येथून 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 39 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले  होते त्यापैकी 27 व्यक्तीचे अहवाल -Ve  निगेटिव्ह आले आहे 12 वयक्तीचे  अहवाल प्रलंबित आहेत याचा अहवाल उदया पर्यंत येतील.  माहिती विषाणु संशोधन व निदोन प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.                                                             ****

हिंगोली, क्वारंटाइन सेंटर मधून २५ लोकांना डिसचार्ज

Image
क्वारंटाइन सेंटर मधून २५ लोकांना डिसचार्ज हिंगोली - बाहेर जिल्ह्यातून हिंगोली येथे दाखल झालेल्या २५  नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन केले होते. बुधवारी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्या २५ लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन, संचार बंदी लागू असताना तसेच जिल्हा बंदी असताना देखील काही नागरिक सर्व वाहने बंद असताना पायी प्रवास करून हिंगोली जवळ केली असता याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार या नागरिकांना आरोग्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये १४ दिवस ठेवून त्यांच्यावर देखरेख करण्यात आली. त्यांचे स्वाब नमुने देखील निगेटिव्ह आले आहेत.  त्यामुळे बुधवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. विठ्ठल करपे, डॉ. पटेल यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन केलेल्या लोकांची पुन्हा डॉ. पटेल यांनी तपासणी केली असता कोरोनासी साम्य असलेली लक्षणे आढळून न आल्याने त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोग्य विभागाने या संशयित  क्वारंटाईन  केलेल्या लोकांची खात्री करू...

रिसाला बाजार परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !

Image
रिसाला बाजार परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण ! जिल्हाधिकारी जयवंशी यांची करडी नजर हिंगोली -  रिसाला परिसरातील एका २४ वर्षीय सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परीचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्यानंतर हा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला. पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असून पालिकेने संपूर्ण भाग निर्जंतुकी करण केला आहे. या परिसराकडे जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार याचे विशेष लक्ष आहे. स्वतः जिल्हाधिकारी जयवंशी यांनी या परिसराची पाहणी करून तीन किलो मीटरचा परिसर सील करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे ९१ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे. मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या १९४ जवाना पैकी ८४ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे.याच बरोबर सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधितावर उपचार करणाऱ्या एका परीचारिकेला देखील लागण झाल्याने त्या परीचारिकेवर आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून उपचार सुरू केले आहेत. ही परिचारिका कोणा कोणाला संपर्क केली यांची खातर जमा आरोग्य यंत्रणेकडून केली ...

विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याच्या रकमे बाबत प्राचार्य/ विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा

Image
विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याच्या रकमे बाबत प्राचार्य/ विद्यार्थ्यांनी 25 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा लातूर,दि.6:- जिल्हयातील शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/ विद्यार्थ्यांना सन 2015-16, 2016-17 व 2017-18 मध्ये प्रवेशित अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना लाभ देण्यासाठी महाईस्कॉल प्रणाली कार्यान्वित होती. त्यानुषंगाने भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती (फ्रीशिप) व व्यावसायिक पाठयक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रक्कमा मंजूर करुन महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या होत्या. तथापी सन 2015-16 ते 2017-18 मधील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे बँक खाते क्रमांक, चुकीचे आय.एफ.एस.सी. कोड भरलेले असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची निर्वाहभत्याची रक्कम अद्याप या कार्यालयाच्या बँक खात्यावर अखर्चित (शिल्लक) आहे. अखर्चीत रक्कमा शा...

लातूर : - दुकाने उघडण्यासाठीची नवीन नियमावली

Image
    जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्यासाठीची नवीन नियमावली 6 मे रोजी जाहीर केली   लातूर- लातूर जिल्ह्यातील आस्थापनांसाठीची नवीन नियमावली लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सोमवार दि . ४ मे २०२० पासून सर्व आस्थापना उघडण्याची परवानगी देण्यात आली होती . मात्र बहुतांश नागरीकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न केल्यामुळे आणि बाजारपेठेतील अनावश्यक गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन लातूर जिल्हा प्रशासनाने आस्थापना उघडण्यासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे . सर्व दुकाने , आस्थापनांचे चालक , मालक आणि कामगारांनी मास्क अथवा रुमाल , स्कार्फचा वापर करणे बंधनकारक . तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्यसेतू एप डाऊनलोड करणे आवश्यक .