Posts

Showing posts from August 20, 2020

पोलीस उपनिरीक्षकाला कोरोना बाधा,अधिकारी, कर्मचारी क्वारंटाइन

Image
पोलीस उपनिरीक्षकाला कोरोना बाधा,अधिकारी, कर्मचारी क्वारंटाइन  सेनगाव पोलीस ठाण्याचे कामकाज बंद सेनगाव - सेनगाव शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराची मानवी साखळी थांबावी यासाठी तालुका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपायोजना केल्या जात आहे. आज सेनगाव येथील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना काल रात्री जोराचा ताप आल्याने त्यांनी आज स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोविंड-19 या य आजाराची तपासणी केली असता, यांचा तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सेनगाव पोलीस स्टेशन हे कोरोना कंटेनमेंट झोन झाल्याने सेनगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण कामकाज बंद असल्याचा फलक पोलीस ठाणे प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.  जिल्हाअधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाच्या नियंत्रणाखाली शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला होता. यामध्ये शहरातील ९९२ व्यापाऱ्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट अंतर्गत  तपासणी करण्यात आल्या होत्या .त्यामध्ये...

हिंगोलीत नव्याने ३७ रुग्णाची भर

हिंगोलीत नव्याने ३७ रुग्णाची भर  हिंगोली -  जिल्ह्यात गुरुवारी ३७ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील आठ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले तर २९ रुग्ण हे आरटीपीसीआर मध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी  दिली आहे. त्यामुळे मृत्यू संख्या १५ वर पोहचली आहे. गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३७ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.यामध्ये ८ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये तर २९रुग्ण आरटीपीसीआर तापसणीत आढळून  आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर पाच,  रुग्ण असून यात आनंद नगर, भोईपुरा,लासीना येथील रुग्णाचा समावेश आहे.तर औंढा परिसर एक, सेनगाव परिसर एक, कळमनुरी परिसर एक असे आठ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. तसेच आरटीपीसीआर तापसणीत २९ रुग्ण आढळून आले आहेत. आज रोजी एकूण ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यात खालील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली आठ,  तर वसमत येथील १५ रुग्ण ,सेनगाव परिसर एक, तसेच कळमनुरी परिसरातील आठ रुग्ण,औं...