बच्चे कंपनींच्या बहारदार फॅशन शो मधे अभिनेता अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक.
बच्चे कंपनींच्या बहारदार फॅशन शो मधे अभिनेता अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक. अनिल चौधरी, पुणे मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच लहानपणीच 'स्टेज फीयर' नाहीसे होऊन व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरता यावे या उद्देशाने सत्यजित जोगळेकर यांनी किड्समंच ची स्थापना केली आहे. किड्समंच आणि 'माय पपेट स्टोरी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'किड्स फॅशन शो' हा पहिला उपक्रम औंध येथील वेस्टेंड मॉल येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरवात बाल कलाकार जीजा परांजपे हिच्या फ्युजन नृत्याने झाली. वय वर्षे अडीच ते नऊ अशा विविध वयोगटातील तब्बल ६५ मुलामुलींनी देशी, विदेशी, फ्युजन प्रकारातल्या पेहेरावात बहारदार रॅम्पवॉक करुन प्रेक्षकांना अचंबित केले. ऐटीत डौलदार पावलं टाकत प्रेक्षकांकडे पाहून स्मितहास्य करत वेगवेगळ्या 'पोज' देणाऱ्या या बालचमुंचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रम ऐन बहरात असतानाच स्टेज वरून अभिनेता अंकुश चौधरी ने एंट्री घेत मुलांबरोबर रॅम्पवॉक करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. योगजा कुलकर्णी यांनी मुलांसाठी...