हिंगोलीत नव्याने २७ रुग्ण पॉझिटिव्ह तर २० रुग्णांना सुट्टी हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने २७ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, यातील २३ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर १४ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तापसणीत २३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर १८ ,कळमनुरी परिसर २वसमत परिसर तीन, असे एकूण २३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १४ रुग्ण सापडले असून, यात कळमनुरी परिसरातील १४ रुग्णांचा समावेश आहे. तर आज वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील तीन ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील दहा,वसमत कोरोना सेंटर येथील तीन ,कळमनुरी केअर सेंटर येथील चार असे एकूण वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ज...