Posts

Showing posts from August 31, 2020

हिंगोलीत कोरोनाने  ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू  सोमवारी नव्याने २७ रुग्ण पॉझिटिव्ह तर १७ रुग्ण बरे

हिंगोलीत कोरोनाने  ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू  सोमवारी नव्याने २७ रुग्ण पॉझिटिव्ह तर १७ रुग्ण बरे   हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी नव्याने २७  कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, यातील सर्व रुग्ण हे आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर १७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.   जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी  प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तापसणीत २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर आठ,सेनगाव ११,वसमत सात, कळमनुरी एक, असे एकूण २७ रुग्ण  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज १७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील दोन, सेनगाव कोरोना सेंटर येथील १५ असे एकूण १७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तसेच  आझम कॉलनीतील ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १० रुग्णांची  प्रकृती गंभीर अस...

जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुन्हा खळबळ

जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुन्हा खळबळ हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या अर्थ  व महिला बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. येथील जिल्हा परिषदेचे अर्थ विभागातील कर्मचारी बालाजी बांगर व महिला व बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हे दोन्ही विभाग आरोग्य विभागाच्या वतीने शील केले असून, कर्मचाऱ्यांना घरी पाठवून दिले आहे. तर या दोघांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारसाठी भरती करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने खाली उतरवून कार्यालयात सानिटाईझ फवारणी करण्यात आली. तर मंगळवारी अकरा वाजता अर्थ, व महिला बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी केली जाणार आहे. महिला बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव हे( ता.२०)ऑगस्ट पासून औरंगाबाद येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात आले असता त्यांना त्रास होऊ लागल्याने ते व युवराज देशमुख यांच...