Posts

Showing posts from May 25, 2020

लातुर जिल्हयातील 82  पैकी 63  निगेटीव्ह, 19 प्रलंबित, आज सर्व लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याचे अहवाल प्रलंबीत

Image
लातुर जिल्हयातील 82  पैकी 63  निगेटीव्ह, 19 प्रलंबित उस्मानाबाद 49 पैकी 43 निगेटीव्ह, 05 प्रलंबित व 1 Reject बीड 57 पैकी 50 निगेटीव्ह, 07 प्रलंबित     विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 188व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 21 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 8 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.   उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 42 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  37 व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन  5 व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित आहेत. निलंगा येथुन 16  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी 10 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. रेणापूर  येथून 03 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  सर्वच 03 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  असे लातुर जिल्हयातील  एकुण 82 व्यक्तींचे स्वॅब...

कळमनुरी - होम क्वॉरंटाईन महिलेला बाहेरगावी जाणे पडले महागात

Image
होम क्वॉरंटाईन महिलेला बाहेरगावी जाणे पडले महागात     आखाडा बाळापूर  येथे गुन्हा दाखल   कळमनुरी -  तालुक्यातील कामठा येथे होम क्वारंटाईनचे आदेश डावलून नांदेड येथे जाणाऱ्या महिलेवर आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सोमवारी  गुन्हा दाखल झाला आहे.   कळमनुरी तालुक्यातील कामठा  येथील एक महिला नांदेड येथून गावी आल्यानंतर त्या महिलेचा होम क्वॉरंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर महिलेने 14 दिवस घरात राहणे अपेक्षित होते.दरम्यान आज उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर ,यांच्या पथकाने  कामठा, येडशीतांडा, कांडली, चाफनाथ, आडा या गावांना भेटी दिल्या. यावेळी श्री खेडेकर यांनी या गावांमधून गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये तसेच स्वच्छता बाळगावी बाहेरगावाहून येणाऱ्या गावकऱ्यांना शाळेमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवावे अशा सूचना दिल्या.   तर कामठा येथील भेटी मध्ये एक महिला होम क्वारंटाईन असतांनाही नांदेड येथे गेल्याचे गावकऱ्यांनी सांग...

पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एक महिला पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या ७० वर

Image
पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एक महिला पॉझिटिव्ह   रुग्ण संख्या पोहचली ७० वर   हिंगोली - मुंबई येथून  गावी परतलेल्या ३० वर्षीय एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील  आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. आता पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ७० वर  पोहचली आहे.   जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे एकूण १६० रुग्ण  झाले आहेत त्यापैकी ९० रुग्ण ठणठणीत होऊन बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली .त्यामुळे आजघडीला ७० पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू केले आहे. तर कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये आठ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये दोन जवान उपचार घेत होते. यापैकी एका जवानाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आल्याने सुट्टी देण्यात आली असून दुसरा जवान उपचार घेत आहे. यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह झालेले सर्वच जवान निगेटिव्ह आल्याने राज्य राखीव दलाच्या अधिकारी यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.   याशिवाय सेनगाव येथील कोरोना सेंटर येथे१२ रुग्णावर उपचार सुरू आहे.तर हिंगोली शहरातील ...