डीएचओ डॉ.पवार ,आरोग्य कर्मचारी तुपकरी यांचा कोरोनावर विजय
डीएचओ डॉ.पवार ,आरोग्य कर्मचारी तुपकरी यांचा कोरोनावर विजय हिंगोली - जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व आरोग्य कर्मचारी प्रशांत तुपकरी हे दोघेही शनिवारी कोरोनावर मात करून घरी परतल्याने आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रुग्णालयात कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. दरम्यान,जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागासह, महसूल, पालिका कर्मचारी ,पोलीस कर्मचारी ,रात्रंदिवस काम करीत आहेत.पर राज्यातून आलेल्या व्यक्तींची नोंद घेणे ,कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्यास आयोसोलेशन वॉर्डात भरती करणे, आशा व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून गावपातळीवर तपासण्या करणे आदी कामे आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्य विभागातील डॉक्टरसह दोन कर्मचाऱ्याला कोरोना बाधा झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानुसार हा आजार पसरवू नये म्हणून आरोग्य विभागातील ३५ कर्मचारी क्वारंटाइन झाले होते. त्यामुळे आरोग्य विभाग काही दिवसासाठी सील केला होता. ग...