शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शंभर टक्के अहवाल आल्यावरच शाळांची घंटी वाजणार
शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शंभर टक्के अहवाल आल्यावरच शाळांची घंटी वाजणार हिंगोली, ता. २२ : जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच वसतीगृह व आश्रमशाळा सोमवार ता. २३ पासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे . मात्र जिल्ह्यात शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे संपूर्ण अहवाल आले नसल्याने तुर्तास शाळेची घंटा वाजणार नाही. दरम्यान याबाबत रविवारी ता. २२ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व पालकांची व्हिडीओ काँन्फरंसद्वारे बैठक घेतली. या बैठकीत शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणी संदर्भात चर्चा झाली. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या कोरोना चाचणी सुरु आहेत. आतापर्यंत जवळपास २७७२ शिक्षकांनी स्वॅब नमुने दिले असून त्यातील आठ ते दहा जण बाधीत निघाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. उर्वरित शिक्षकांच्या अहवाल येणे बाकी आहे यामुळे सर्व शिक्षकांचे अहवाल आल्यावरच शाळा सुरू करण्या बाबत चर्चा झा...