ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा हिंगोली - येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को. ऑप. बँकेला मागील आर्थिक वर्षात ३.१५ कोटीचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सुनील देवडा यांनी ऑनलाइन झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालकांना दिली. मंगळवारी बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली (ता.२२) सर्व साधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश सोनी,संचालक विठ्ठलदास धनावत ,नरेंद्र मोदी, नरेंद्र अग्रवाल,प्रकाश गोयल,बजरंगलाल अग्रवाल ,डॉ. हंसादेवी बगडीया ,सुभद्रादेवी मंत्री,ज्ञानेश्वर मामडे,शशिकांत दोडल,राजेंद्र निमोदिया ,गजानन देशमुख,आशिष काबरा,विजय अग्रवाल,राजेश अग्रवाल,राजू मुदिराज,एम. एम. बुद्रुक, राजेश कयाल ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जोशी,सहाय्यक व्यवस्थापक संजय राजेश्वर , दिलीप देशपांडे,कंदी आदींची उपस्थिती होती. यावेळी नोटीसीचे वाचन करण्यात आले. ओमप्रकाश देवडा पीपल बँकेचा आलेख अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली दिवसेंदिवस वाढत असून बँकेची वाटचाल प्रगतीकडे चालू आहे. दरम्यान, मंगळवारी बँकेत ३८वि वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स...