अंगणवाडी सेविका, आशा वर्करकडून डोअर टू डोअर सर्व्हेक्षण
अंगणवाडी सेविका, आशा वर्करकडून डोअर टू डोअर सर्व्हेक्षण कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची केली जाते जनजागृती हिंगोली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अंगणवाडी सेविका सह आशा वर्कर ही मैदानात उतरल्या असून जिल्ह्यातील गावात डोअर टू डोअर जाऊन बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून सर्व्हेक्षण देखील केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांनी दिली आहे. भारतात गेली दहा दिवसापासून कोरोना नावाच्या विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. हा संसर्ग इतर राज्यात पसरवू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने रविवारी( ता.२२) जनता कर्फ्युचे नागरिकांना आवाहन केले होते त्यानुसार सर्वत्र जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील खबरदारी म्हणून खाजगी बसेस, सरकारी बसेस, रेल्वे गाडया बंद करण्यात आल्या त्यामुळे बाहेर राज्यातील, येणाऱ्या नागरिकांचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून राज्य सरकारच्या आदेशानुसार गर्दीच्या ...