जगाच्या पाठीवर अधिराज्य करणारे राजे -खा.हेमंत पाटील
हिंगोली - अखिल विश्वात प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्साहात ,भक्तीभावाने जयंती साजरी होणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवद्वितीय राजे आहेत . केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी अतिशय बेलाग, मजबुत अशा ३७० किल्ल्यांची निर्मिती केली. आठशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट अंधारातून रयतेला काढून त्यांना स्वाभिमानाने जगण्यास शिकवले असे प्रतिपादन खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी केले. दि .१९ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य दिव्य सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला, यावेळी खासदार हेमंत पाटील बोलत होते. यावेळी शिवविचार पीठावर जिल्हा परिषद हिंगोलीचे अध्यक्ष गणाजी बेले, हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी खा.शिवाजीराव माने , माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रामेश्वर शिंदे, उद्धवराव गायकवाड, शिवजयंती महोत्सवाचे अध्...