Posts

Showing posts from February 15, 2020

प्रहार जशक्‍तीचे पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन

Image
प्रहार जशक्‍तीचे पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन   हिंगोली - सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे  शुक्रवारपासून (ता.१४) राशनकार्ड संदर्भात  बोंबाबोंब आंदोलन सुरू करण्यात आले आहे .   तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे ग्रांमपंचायत कार्यालय समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवारपासन  विविध मागण्या संदर्भात सकाळी साडे दहा वाजता आंदोलन सुरू केले आहे. गावातील बऱ्याच  लाभार्थीकडे राशनकार्ड नाहीत. ते देण्यात यावी. दाताडा बुद्रुक ते आजेगाव रस्त्याचे काम तीन वर्षापासून रखडलेले आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. गावा जवळच असलेल्या नाल्यावरील पुलाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे यासह विविध मागण्यासाठी  गावकरी व प्रहारच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन सुरू आहे.    हे आंदोलन जिल्हाध्यक्ष ॲड. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली बालाजी गायकवाड, गोपाल पुरी, अशोक गवळी, श्री. कांबळे, भुजंग शिंदे, ज्ञानेश्वर शेटे, राजू अंभोरे, गजानन संगेकर, तानाजी साबळे, अनिल साबळे, राजीव साबळे, रवी साबळे आदींचा यात सहभाग आहे.       R...

चेक वटला नाही आरोपीस तीन महिन्याची शिक्षा

Image
चेक वटला नाही आरोपीस तीन महिन्याची शिक्षा लातूर -धनादेश न वटल्याने आरोपी उषा व्यंकटराव मंदाडे ,रा. लातूर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब दुसरे श्री.एस.बी.शेख यांनी आरोपीस कलम 138 नि.ई.अ‍ॅक्ट प्रमाणे तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा व रू.5000 /-दंड व दंड  न भरल्यास आठ दिवसाची शिक्षा तसेच धनादेशाची रक्कम रू.60000/- फिर्यादीस परत करण्याची शिक्षा आरोपीस सुनावली.  सदरील प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी मदिनाबी युसूफ शेख यांच्या कडून आरोपीने हातऊसणी रक्कम रू60000/- घेतली होती. व सदरील रक्कम दोन महिन्याच्या आत परत करण्याची हमी व आश्‍वासन दिले होते. परंतू आरोपीने सदरची रक्कम मुदतीत परत केली नाही.आरोेपीने फिर्यादीस सदरील रक्कमेच्या परतफेडीसाठी रक्कम रू.60000/- चा यशवंत नागरी सहकारी बॅक.लि. लातूर धनादेश दिला व सदर धनादेश वटविण्याची हमी दिली. फिर्यादिने सदरचाा धनादेश बॅकेत वटविण्याकरिता लावला. असता आरोपीच्या बॅकेने अपुरा निधी असा शेरा मारून सदरचा धनादेश न वटविता परत केला. त्यामुळे फिर्यादीने आरोपीस आपल्या वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशाच्या रक्कमेची मागणी केली. परंतु आरोपीने...

प्रा.डॉ.सिध्दार्थ तुकाराम सुर्यवंशी यांची महाराष्ट्रभूूषण,जीवनगौरव,समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

Image
लातूूर-लातूर येथील दयानंद विधी महाविदयालयाचे प्रा.डॉ. सिध्दार्थ तुकाराम सुर्यवंशी यांची महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण, जीवनगौरव,समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  सदरील पुरस्कार हा सामाजीक,राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, उदयोग या कार्यासाठी दिला जातो. हया पुरस्काराचे वितरण दिनांक 16/02/2020 रोजी स्वं.शंकरराव चव्हाण सभागृह,स्टेडियम जवळ, नांदेड येथे होणार आहे. हया पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण,खासदार हेमंतभाऊ पाटील, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे,डॉॅ. मुंकूदराव व्हि पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहेे.  तरी या निवडीबददल डॉ.सिध्दार्थ सुर्यवंशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

एसआरटी च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

Image
एसआरटी च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान     संतप्त विद्यार्थ्यांचे उदगिरी कॉलेजात ठिय्या आंदोलन, आगामी परिक्षेवर बहिष्कार   उदगीर(संगम पटवारी) स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या २०१९ च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांसाठी घातक ठरली असून नवीन नियमानुसार विद्यार्थी अडचणीत येत आहेत. शिवाय गुणवत्ताही घसरत असून गेल्या दोन सत्रांमध्ये गुंणवतायादीत मध्ये आलेले विद्यार्थीही या परीक्षेत  अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या नवीन परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार करून  मागील सत्रातील परीक्षेचाही पुनर्विचार करावा या मागणीसाठी  महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून या नवीन परीक्षा पद्धतीचा निषेध करण्यात आला. नामदार संजय बनसोडे यांना निवेदनही देण्यात आले असुन विद्यार्थ्यांनी आगामी परिक्षेवर बहिष्कार घातला आहे.       स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने  २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अचानकपणे मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये...

प्लास्टिक जप्तीच्या नावाखाली पाण्याची नासाडी

Image
प्लास्टिक जप्तीच्या नावाखाली पाण्याची नासाडी हिंगोली - पालिकेच्या वतीने शुक्रवार पासून प्लास्टिक जप्ती मोहीम हाती घेतली आहे.काल पन्नास दुकानावर धाडी टाकून सव्वा दोन क्विंटल प्लस्टिक जप्त करून एक लाखाचा दंड वसूल केला. शनिवारी  काही गोदामावर धाडी टाकून पाण्याचे पाउच जप्त करून वाहतूक शाखेच्या लगत असलेल्या भर रस्त्यावर रोलर ने दाबून पाउच ची नासाडी केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.   मागील सहा महिन्यांपासून प्लास्टिक मोहीम थंडावली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्लास्टिक साठा करून ठेवला होता.मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेला उशिराने जाग आली. आणि धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी शहरातील बड्या व्यापाऱ्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतली. प्लास्टिक मोहीम राबवायची तर सहा महिन्यांचा कालावधी का सोडला असा प्रश्न उपस्थित होत आहे.    प्लास्टिक जप्ती मोहीम थंडवल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकानात प्लास्टिक साठा केला होता. झोपलेल्या पालिकेला उशिराने जाग आली आणि धडक कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सुर निघाला. शनिव...

अतिक्रमण भागातील तालुका भूमी अभिलेखकडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन 

अतिक्रमण भागातील तालुका भूमी अभिलेखकडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन    हिंगोली - शहरातील जलेश्वर  तलावासमोरील अतिक्रमण भागातील शनिवारी (ता.१५) तालुका भूमी अभिलेख कार्यलया कडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होऊन एकत्र जमले होते.   शहरातील जलेश्वर तलाव काठावर गेली चाळीस वर्षांपासून १९५नागरिकांनी अतिक्रमण करून कच्ची व पक्की घरे बांधली.त्यामुळे जलेश्वर तलावातील पाणी दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. शिवाय पाच महिण्यापूर्वी तलावातील मास्यांचा देखील तडफडून मृत्यू झल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तसेच मंदिरात ही घाण पाणी गाभाऱ्यात जात होते.   जलेश्वर तलाव काठावरची जागा ही महसूल विभागाची असल्याने काठावर अतिक्रमण करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून आदेश आल्यानंतर अतिक्रमण काढावे लागणार आहे. त्यामुळे शनिवारी भूमी अभिलेख कार्यालयाकडुन रेखांकन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी पैंजणे, तहसीलदार मधुकर खंडागळे, कार्यकारी दंडाधिकारी  वडवळकर,पोटे, बेले, इंगोले, गवई यांच्यासह पोलिसांच...

राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचा सत्कार 

Image
  हफिज मित्र मंडळाच्या वतीने लाडूतुला     वसमत - वसमतचे तत्कालीन  पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवार (ता.१४) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार चंद्रकांत नवघरे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार , अ.हफिज अ. रहेमान, ग्रामिण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके , पुर्णा ग्लोबलचे अध्यक्ष विनोद झंवर यांची उपस्थिती होती.     सन २०१०-२०१३ या कालावधीत वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणुन सर्जेराव पाटील कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात  पाटील यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावा यासाठी नागरीक वा पोलीस यांचा समन्वय घडवून आणला. तसेच गणेश उत्सवासह विविध धार्मिक उत्सव शांततेत पार पडावे यासाठी सर्व समाजामध्ये एकोपा घडवून आणला. विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामुळे वसमतकरांना सर्जेराव पाटील यांनी लावून दिलेली शिस्त , प्रेम हे कायम आहे.    नुकताच पोलीस निरीक्षक सर्जेराव प...