Posts

Showing posts from May 1, 2020

गुरूवारी सायंकाळीपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या शून्य

Image
परभणी, गावंडे प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 803 संशयितांची नोंद झाली. 764 पैकी 674 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान,  जिल्ह्यात गुरूवारी(दि.30) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे. गुरूवारी नव्याने 71 संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. अधीचे 732 असे एकूण 764 पर्यंत संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 249, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात  71 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले  483 जण आहेत.  62 जण परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले 6 जण आहेत. आजपर्यंत प्रलंबीत स्वॅबची संख्या 71 असून तपासणीसाठी आवश्यक नसल्याचे 18 स्वॅब असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. सेलूच्या परिस्थितीवर नियंत्रण सेलूतील राजमोहल्लातील रहिवाशी 55 वर्षीय महिला दुर्धर आजाराने काही महिन्यांपासून औरंगाबादला उपचारार्थ होती. 27 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता खासगी वाहनाद्वारे ती महिला सेलूत...

डॉक्टर आपल्या दारी उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Image
भारतीय जैन संघट नाः पी.डी.महाविद्यालयाचा उपक्रम परभणी, गावंडे,  जि. प्रतिनिधी लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य विषयक समस्या सुटाव्यात या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना व पी.डी. जैन होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाने गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरूवारी(दि.30) पाचव्या दिवशी अंबीका नगर परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.परिसरातील 150 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत औषधी देण्यात आली तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढऊन करोनाला प्रतीबंध करण्यासाठी अर्सेनीक अल्बम 30 ही होमिओपॅथीक औषधी मोफत देण्यात आली.याप्रसंगी भारतीय जैन संघटना विभागाचे झुंबरलाल मुथा,  नीरज पारेख, पवन झांझरी, मुकेश जैन, महाविद्यालयाचे सचिव अभयराज जैन, प्राचार्य डॉ.विजय दाभाडे उपस्थित होते.  ङॉ. सुहास विभुते, ङॉ. शाम देशमुख, डॉ.मंजूषा नरवाडकर, डॉ.सुधीर येरमल,  डॉ.सिद्धार्थ पैंठणे,डॉ.मनोज पोरवाल, डॉ.सतिश घुले, योग शिक्षक जिंतूरकर यांनी नागरिकांची तपासणी केली.

ऑरेंज व ग्रीन झोन मधील  दारू दुकाने चालू होणार

Image
ऑरेंज व ग्रीन झोन मधील  दारू दुकाने चालू होणार पान टपऱ्या चालू होणार  5 लोक प्रत्येकी 6 फुटाचे अंतर ठेऊन दारू विकत घेता येईल, दारू पिणाऱयांची सोय झाली असून आता माहागाची दारू विकत घेण्याची गरज नाही. फक्त वाईन शॉप कांही अटीवर सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. ग्रीन झोन मधील 6 जिल्हे तर 16 ऑरेंज जिल्हातच दारू दुकाने सुरु होणार.   

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे . – प्रवीण मेंगशेट्टी 

Image
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे . – प्रवीण मेंगशेट्टी  उदगीर   ( संगम पटवारी ) कोरणा विषाणू प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत उदगीर शहरामध्ये स्वतंत्रपणे दोन विभाग बनवून ते विभाग पूर्णपणे प्रतिबंधीत भाग म्हणून जाहीर करण्यात आले असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत या प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही  जाऊ नये. तसेच शहरात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात प्रतिबंधित क्षेत्र वगळुन शहराती ईतर भागात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात येणार आहे. मात्र कोणीही अनावश्यक रस्त्यावर फिरू नये  अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिला आहे. उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्या कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्यावतीने नुकतेच एक पत्र जारी केले असून या प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदीनुसार निर्बंध व मज्जाव घालून मनाईहुकूम आचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. उदगीर विभागातील उदगीर श...

उदगीर : एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 8

Image
उदगीर : एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 8 संगम पटवारी :- दिनांक 30.04.2020 रोजी एकूण 45 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी (कोविड19)साठी करण्यात आली होती त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. त्यांपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. दिनांक 01.05.2020 रोजी एकूण 53 व्यक्तींचे  स्वॅब (कोविड 19)  तपासणी साठी आले होते.   त्यापैकी 39व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्या सर्व 39 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 14 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी चालू असून रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

प्रोफेसर पाटील यांचे विद्यार्थ्यांना झूम एप द्वारे ऑनलाईन धडे

Image
प्रोफेसर पाटील यांचे विद्यार्थ्यांना झूम एप द्वारे ऑनलाईन धडे सेनगाव -  येथील तोष्णीवाल  महाविद्यालयात कार्यरत असलेले अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर पी. बी. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे बीए तृतीय वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता.३०)  झूम अॅपच्या मदतीने ऑनलाइन मार्गदर्शन केले.  भारताच्या आर्थिक विकासात शेतीचे स्थान  या विषयावर प्रकाशझोत टाकला . शेतीची वैशिष्टे व महत्त्व या मुद्द्यावर विस्तृत चर्चा केली. शेतीतून कमी  उत्पन्न होणे, तसेच उपाययोजना यावर त्यांनी विस्तृत असे भाष्य करून चर्चा केली, इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात शेतीतून कमी उत्पन्न होण्यामागील कारणे व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. जगभर कोरोना या महामारीमुळे  लॉकडाउन  सुरु असल्याने महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातही  विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता यावे  यासाठी सदरील उपक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित केला आहे .सदरील ऑनलाइन ...

जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याविना ध्वजारोहण !   जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण   हिंगोली - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात  गेली दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने याचा फटका खुद्द जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना बसल्याने त्यांना शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजा रोहनास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वजारोहण केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण  समारोह सोहळा मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद  शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे महासमादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची उपस्थिती होती. देशभरासह र...

अन दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या महिलेने रस्त्यातच दिला गोंडस कन्येला जन्म 

Image
.. अन दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या महिलेने रस्त्यातच दिला गोंडस कन्येला जन्म हिंगोली- जालना येथून कळमनुरीकडे दुचाकीने जाणाऱ्या एका मजुर महिलेची हिंगोली जिल्ह्यातील जलालढाबा येथे रस्त्यावरच प्रसूती झाली. लागलीच आजूबाजूच्या महिला त्या महिलेसाठी धावून आल्या. तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन माता सुखरूप आहे. ही पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांना कळताच त्यानी पत्नीसह एक खाजगी गाडी घेऊन त्या महिले जवळ धाव घेतली. ज्योती शेळके असे प्रसूत झालेल्या महिलेच नाव असून, ती आपल्या नातेवाईकासह जालना जिल्ह्यात कामानिमित्त गेली होती. कोरोना मुळे अडकून पडलेल्या 20 ते 25 मजुर एका टेम्पोतुन कळमनुरीकडे रवाना झाले होते. तर ज्योती ही आपल्या मामाच्या मुलासोबत दुचाकीवर जात होती. रस्त्यावर जागोजागी पोलीस तैनात असल्याने, त्यानी भीत भीत पोलिसांची नजर चुकवून मार्ग काढत होते. ज्योती ही ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी मार्गे मामाच्या मुलासोबत जात असताना, जलालधाबा येथे पोहोचताच प्रसूती वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे दोघेही बैचेन झाले. मात्र मामाच्या मुलाने रस्त्याच्या कडेला असलेल्या आखाड्यावरील महिलेला मदतीसाठी ...

पंजाबहुन परतलेल्या एका चालकास कोरोनाची बाधा, कोरोना बाधितांची संख्या ४७

Image
 पंजाबहुन परतलेल्या एका चालकास कोरोनाची बाधा कोरोना बाधितांची संख्या ४७ वर , रुग्ण संख्येत कमालीची वाढ हिंगोली -  क्वारंटाइन करण्यात आलेल्या  राज्य राखीव दलाच्या २५ जवानासह पंजाबहून परतलेल्या एका चालकास  अश्या एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी  (ता. १) साडे नऊच्या सुमारास  प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या ४७ वर पोहचली असून ,तर एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास यांनी दिली.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील  आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आलेल्या  एसआरपीएफच्या २५ जवानांचे स्वाब नमुने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविले होते .त्या सर्वांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला असल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तर  वीस जवानांना  एसआरपीएफच्या हॉल मध्ये क्वारंटाइन केले आहे. व पाच जवान आयसोलेशन वॉर्डात भरती केले आहेत. त्यामुळे य...