Posts

Showing posts from May 28, 2020

परभणी, एकूण 67 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह, गुरूवारी 108 जण दाखलः संशयितांची संख्या 2128

Image
गुरूवारी 108 जण दाखलः संशयितांची संख्या 2128 एकूण 67 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह   परभणी, (प्रतिनिधी): कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरूवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 108 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2128 पर्यंत पोचली आहे. 311 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.   एकूण 2246 पैकी 1782 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 67 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 61 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 311 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून गुरूवारी एकूण 183 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. गुरूवारी 44 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले.  जिल्हा शासकीय रूग्णालयात गुरूवारीपर्यंत विलगिकरण कक्षात 523, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 342 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1263 जण आहेत.  

परभणी महानगरपालिका यावर्षी टॅंकरमुक्त, टॅंकरलॉबीचं ग्रहण सुटलं

Image
  टॅंकरलॉबीचं ग्रहण सुटलं परभणी महानगरपालिका यावर्षी टॅंकरमुक्त   परभणी,(प्रतिनिधी): सुधारीत पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात महानगपालिका हद्दीतील प्रभागांना टंचाईची झळ सोसावी लागली नाही किंवा प्रशासनास सुध्दा आतापर्यंत पाणी पुरवठ्याकरिता एक टॅंकरसुध्दा तैनात करावा लागला नाही. गेल्या काही वर्षापासून प्रत्येक उन्हाळयात परभणीवासियांनी उष्णतेच्या लाटेबरोबर पाणी टंचाईच्या भयावह झळा, यातणा सोसल्या आहेत. 15 ते 20 दिवसांआड होणारा पाणीपुरवठा , तो वेळीअवेळी, विशेषतः मध्यरात्री किंवा पहाटे तसेच हंडाभर पाण्यासाठी श्रमिकांची कुटुंबियांसह भटकंती हे विदारक चित्र गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येकाने अनुभवले आहे. नव्हे त्याचे चटके सुध्दा सोसले आहेत. ते एवढे की, अन्य जिल्ह्यात परभणीकरांच्या या सहनशीलतीचे किस्सेही प्रत्येक वर्षी रंगवल्या गेले आहेत. सोशल मिडियातून टंचाईच्या काळात परभणीकरांच्या सोशकतेबद्दल असंख्य किस्से फॉरवर्ड होत राहिले. त्यात विशेषतः परभणीचे सासर नको बाई.., परभणीत सुट्टीत माहेरी नको. इतपर्यंत विडंबन होत आले आहे. एवढे किस्से रंगत असत...

मोती नगर, लातूर 1+Ve तर जिल्यात आज एकही रुग्ण नाही, उस्मानाबाद 9 व बीड 5 +Ve

Image
मोती नगर, लातूर 1+Ve तर दिलासादायक :- जिल्यात आज एकही रुग्ण नाही, उस्मानाबाद 9 व बीड 5 +Ve  उस्मानाबाद 44 पैकी 32 निगेटीव्ह 09 पॉझिटिव्ह 03 (Inconclusive) बीड 41 पैकी 36 निगेटीव्ह 05 पॉझिटिव्ह   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 28.05.2020 रोजी एकुण 144 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती मोती नगर लातूर येथील रहिवासी असून सद्यस्थितीत या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 08 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  सर्वच 08 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  चाकुर येथुन 03 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी तिन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 03 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आल...

दिलासादायक ; वसमत येथे पाच जण निगेटिव्ह तर  एक ४२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

Image
दिलासादायक ; वसमत येथे पाच जण निगेटिव्ह तर  एक ४२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह   जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख स्थिर    हिंगोली -  वसमत येथील कोरोना केअर सेन्टर येथील भरती करण्यात आलेल्या पाच रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला तर एक मुंबई वरून परतलेला ४२ वर्षीय रुग्णाला कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यातील कोरोना आलेख घसरल्याने रुग्ण संख्या ७० वर आली आहे.   दरम्यान, वसमत येथे मुंबई वरून आलेल्या मजुरांना कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले होते ,यातील पाच रुग्णांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने  समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मुंबई येथून वसमत येथे परतलेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे.   आतापर्यंत जिल्ह्यात १६६ रुग्ण कोरोना विषाणूचे आढळून आले आहेत .त्यापैकी ९६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आता आजघडीला ७० पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. दरम्यान सद्य स्थितीत भरती करण्यात आलेल्या रुग्णापैकी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे...

हिंगोली : व्हीआरआरटी पथकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा 

व्हीआरआरटी पथकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा  भानखेडातांडा येथील घटना हिंगोली -  सेनगाव तालुक्‍यातील भानखेडातांडा येथे बाहेर गावावरून आलेल्यांना क्‍वारंटाईन का केले या कारणावरून व्हीआरआरटी पथका सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता. 28) गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे.  या बाबत माहिती अशी की, सेनगाव तालुक्‍यातील भानखेडातांडा येथे दिनकर पवार, बबन पवार यांना  क्‍वारंटाईन का केले म्‍हणून अंकूश पवार व विजय पवार यांनी व्हीआरआरटी पथकातील सदस्यांना आश्लील भाषा वापरल्यामुळे पथकाच्या अध्यक्षा तथा सरपंच ज्‍योती कोटकर यांनी दिलेल्या पत्रावरून हट्टा पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. दरम्‍यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली उपविभागात मुंबई, पुणे अशा महानगरातून तसेच इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांनी क्‍वारंटाईन कक्षात किंवा कोरोना विषाणुच्या अनुषंगाने स्‍थापन करण्यात आलेल्या रुग्णालयात दाखल होवून उपविभागातील वाढती रुग्णसंख्या व इतर जिल्‍ह्‍यातून हिंगोली येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता जिल्‍ह्‍...

हिंगोली :- अवेध वाळूच्या चार ट्रॅक्टरसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Image
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, लॉक डाऊन मधील वाळू माफियावर सर्वात मोठी कारवाई आठ जनावर गुन्हे दाखल हिंगोली - लॉकडाऊन काळात ही चोरी छुप्या मार्गाने अवेध वाळूची तस्करी  दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत असल्याने गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत खानापूर परिसरात चार ट्रॅक्टर सह २२लाख ,९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जनावर कळमनुरी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वाळू माफियाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लॉक डाऊन, संचारबंदी कायदा लागू केला आहे. दरम्यान या काळातही छुप्या मार्गाने वाळू माफियाकडून वाळू विक्री होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अवेध वाळूची चोरटी विक्री करणाऱ्यांवर मोहीम  हाती घेण्यात आली असता या मोहिमे दरम्यान चार जनावर केसेस करून त्यांच्याकडून२२ लाख ९७ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कळमनुरी हद्दीतील कळमनुरीते खानापूर रस्त्यावर तसेच शिवपार्वती धाबा ते लासीना पाटी या प...