Posts

Showing posts from July 9, 2020

लातूर 29, उदगीर 11, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02 = 53 पॉझीटीव्ह

Image
दिनांक 09.07.2020 लातूर 29, उदगीर 11, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02 = 53     लातूर 392 पैकी 271  निगेटिव्ह 53 पॉझिटिव्ह 22 Inconclusive, 43 प्रलंबित व 03 रद्द   विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  84 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 53 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14  व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत  व 05 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. दिनांक 08.07.2020 रोजी 06 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. लातूर : ----- भाग्यनगर 04, बसवेश्वर चौक 05, आनंद नगर 02, गवळी नगर 01, रामगिरी नगर 03, तर सदाशिव नगर,  मोती नगर, केशव नगर, नावंदर गल्ली, शारदा नगर, सेंट्रल हनुमान मध्ये प्रत्येकी 01  *लातूर* आज दिनांक 9 जुलै 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून 12, एमआयडीसी येथील कोविड केअर से...

दिलासादायक ; आठ योध्याचा कोरोनावर विजय तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Image
दिलासादायक ; आठ योध्याचा कोरोनावर विजय तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह  हिंगोलीत कभी खूसी कभी गम हिंगोली - गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात लिंबाळा कोअर सेंटर येथील तीन, औंढा चार तर वसमत येथील एक असे आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर हिंगोली येथे हैद्राबाद वरून आलेला व वसमत येथे एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जिल्ह्यात कही ख़ुशी कही गम असल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्ड अंतर्गत उपचार घेत असलेल्या४३ वर्षीय तरुण हा शहरातील गांधी चौक येथील नातेवाईकांकडे आला असून तो हैद्राबाद वरून गावी परतला आहे. तसेच वसमत क्वारंटाइन सेंटर येथील एका२५ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असून तो वापटी येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथून गावी परतला आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार लिंबाळा येथील तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये तालाब कट्टा एक, केंद्रा दोन, यांचा समावेश आहे. तर औंढा येथील कोअर सेंटर येथील चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना  डिसचार्ज देण्यात आला आहे. यात औंढा दोन, भोसी दोन या रुग्णाचा समावेश आहे.तसेच वसमत येथी...

परभणी जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव रुग्ण

Image
परभणी जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव रुग्ण  परभणी /प्रतिनिधी  जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी 3 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.   परभणी शहरातील गांधी पार्क  परिसरात राहणारा 33 वर्षीय युवक व शहरातील सोनार गल्ली  भागातील 60 वर्षीय महिला  कोरोना बाधित  झाली आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील 45 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. परभणीतील गांधी पार्क भागातील बाधित युवक जिल्हा परिषद कार्यालयात  कार्यरत आहे. त्याची नियुक्ती जिल्हा कचेरीतील ऑनलाइन पास देण्यासाठी करण्यात आली होती. त्या ठिकाणी तो बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 183 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 75 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पेडगाव १४ दिवसासाठी रेड झोन घोषित

Image
पेडगाव १४ दिवसासाठी रेड झोन घोषित जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आदेश हिंगोली - तालुक्यातील पेडगाव येथे दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून परतलेला एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने त्याचा संसर्ग गावात व परिसरात फैलावू नये म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पेडगाव येथील सर्व सीमा गुरुवारी बंद करण्याचे आदेश काढले असून १४ दिवसासाठी हा परिसर रेड झोन घोषित केला असल्याने गावातील नागरिकांना बाहेर येता येणार नाही तर बाहेरील नागरिकांना या काळात प्रवेश करता येणार नाही. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी १४कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. अधिक नागरिक हे पुणे, मुंबई, औरंगाबाद या हॉटस्पॉट झोन मधून गावी परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट कमी असतानाही बाहेरून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शिवाजी पवार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे , अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे,तलाठी अयुब पठाण आदींनी प...

परभणी, कोरोनाचा पाचवा बळी;

  कोरोनाचा पाचवा बळी; रवळगावचा वृद्ध रुग्ण दगावला परभणी /प्रतिनिधी  जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी एका 60 वर्षीय  रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. तो सेलू तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी होता. 7 जुलै रोजी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवार सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 73 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  सेलू व गंगाखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.

लातूर 08, निलंगा 07,  उदगीर 04, अहमदपूर 01, देवणी 01 एकूण 21 +Ve 

Image
दिनांक 08.07.2020 चे 09.07.20 सकाळी 6.45 प्राप्त रिपोर्ट  लातूर 216 पैकी 172 निगेटिव्ह 21 पॉझिटिव्ह 15 Inconclusive, 06 प्रलंबित व 02 रद्द लातूर 08, निलंगा 07,  उदगीर 04, अहमदपूर 01, देवणी 01 एकूण 21 +Ve  लातूर मधील - मजगे नगर, महादेव नगर,  खडगाव,  मोतीनगर, कुलस्वामिनी नगर,  मिस्कीन नगर, सर्व प्रत्यकी 01 रुग्ण  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  65 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 49 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 10 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत    अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.