Posts

Showing posts from July 30, 2020

कही खुशी कही गम ; हिंगोलीत गुरुवारी आणखी ५ रुग्ण बाधित ,  ९ रुग्णांना सुट्टी, सात मृत्यू

कही खुशी कही गम ; हिंगोलीत गुरुवारी आणखी ५ रुग्ण बाधित, ९ रुग्णांना सुट्टी आतापर्यन्त सात  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू ,   हिंगोली -  जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार गुरुवारी नव्याने एकुन पाच बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर  नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.तर एकीकडे कही खुशी ,कही गम अशी परिस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त अहवालानुसार  नऊ  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्येजिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील दोन पैकी हिंगोली आझम कॉलनी एक व वसमत येथील शुक्रवार पेठ असे दोन रुग्ण, वसमत कोरोना केअर सेन्टर येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत, यामध्ये शिरली एक, पळस गाव एक यांचा समावेश आहे. तसेच लिंबाळा सेंटर येथील गवळीपुरा येथील पाच रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. आज रोजी हिंगोली जिल्हयात पाच नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली शहरातील तापडिया एनटीसी येथील तिघा जणां...

हिंगोली, आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती, एकाच कक्षात मिळणार कोरोना रुग्णाची माहिती

Image
जिल्हा परिषदेत आता जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना हिंगोली - कोरोना बाधित रुग्णांची माहिती तातडीने एकाच कक्षात उपलब्ध व्हावी यासाठी आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना गुरुवारी करण्यात आली असून या समितीत आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या समितीचे जिल्हा समन्वयस्क म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांच्याकडे जबादारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता एकाच कक्षात संपूर्ण माहिती मिळणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता. रुग्णाची सर्व माहिती एकाच कक्षात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णा साठी विविध यंत्रणेकडून होत असलेल्या कारवाहीची एकत्रित माहिती गोळा करून जिल्हास्तरावर या कक्षात उपलब्ध होणार असल्याचे  धनवंत माळी यांनी सांगितले. धनवंत कुमार माळी हे या गठीत केलेल्या नियंत्रण कक्षाचे समन्वयक असून यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी डॉ, प्रवीनकुमार घुले, वैद्यकीय अधिकारी ...

हिंगोली, महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ   हिंगोली,दि.30:  अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व उज्वला योजनेचा लाभ घेण्याकरीता संस्थाना दि. 25 जुलै, 2020 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर प्रस्ताव मागविण्याच्या दिनांकात मुदतवाढ करण्यात आली असून प्रस्ताव मागविण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट, 2020 करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे. त्यासाठी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान महिलाकरीता सुविधा उपलब्ध असावी. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान वीस लाख रुपयांचा असावा. संस्थेच्या नांवे किमान...

हिंगोली, जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण 09 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण 09 जणांना डिस्चार्ज; 161 रुग्णांवर उपचार सुरु            हिंगोली, दि.31:  जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 09 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.             नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एन.टी.सी. तापडीया ईस्टेट, हिंगोली येथील 03 व्यक्ती, काबरा जिनिंग जवळा पळशी रोड, हिंगोली येथील 01 व्यक्ती आणि बाराशिव ता. वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 05 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .             तर बरे झालेले रुग्णांमध्ये आयसोलेशन वार्ड, सामान्य रुग्णालय,हिंगोली येथील 02 ,  कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02 आणि कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील 05 असे एकूण  09 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.           ...