सावधान - हिंगोली पुन्हा आज 8 +Ve, रुग्णांची संख्या 75 वर गेली
जिल्ह्यात सहा रुग्ण कोरोनामुक्त ,तर मुंबईहून परतलेले 08 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेली ७५ वर हिंगोली - वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती करण्यात आलेल्या हट्टा तीन, वसमत दोन, भिरडा असे सहा कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर यात एका चार वर्षीय बालकासह सात रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून रुग्ण संख्या ७५ वर गेली आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत येथील क्वारंटाइन सेंटर येथे भरती करण्यात आलेल्या सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यामध्ये एका चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. हे सर्व नागरिक मुंबई येथून परतलेले असून ,वसमत तालुक्यातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. आजघडीला जिल्ह्यात ७५ रुग्ण कोरोना बाधित असून,जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. तर कोरोना सेंटर मध्ये कळमनुरी आठ, सेनगाव १२,हिंगोली ३१,वसमत ११, असे एकूण६२ रुग्णावर उपचार सुरू केले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्हा सामान्य रुग...