उदगीरच्या ३९ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
उदगीरच्या ३९ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द तालुक्यातील वीस गावच्या ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या अनुसूचित जाती जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एकूण 39 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांची पदे रिक्त करण्यात आली आहेत. उदगीर (संगम पटवारी ) तालुक्यातील वीस गावच्या ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या अनुसूचित जाती जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एकूण 39 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांची पदे रिक्त करण्यात आली आहेत. या रिक्त पदांचा अहवाल निवडणूक विभागाला पाठवला असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी ही माहीती दिली आहे.  2018 मध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडून आल्याच्या सहा महिन्याच्या आत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याची कार्यवाही केली होती. मात्र तत्कालीन शासनाने एक आदेश काढून या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र तालुक्यातील ...