Posts

Showing posts from April 27, 2020

चिंताजनक;  हिंगोलीत पुन्हा एक जवान पॉझिटिव्ह

Image
चिंताजनक;  हिंगोलीत पुन्हा एक जवान पॉझिटिव्ह हिंगोली -  येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल केलेल्या पाच जवाना पैकी चार जणांचे अहवाल सोमवारी सकाळी पाझिटिव्ह आले तर उर्वरित एकाचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून तो जवान ही पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.  येथील एसआरपीएफच्या बारा जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन जवान मुंबई येथे कार्यरत होते.तर दहा जवान मालेगाव येथे कर्तव्यावर होते.(ता.२५) रोजी जालना येथून एक जवान हिंगोलीचा रहिवासी असल्याने तो जालना येथून परत आला. त्याचे थ्रोट स्वाब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या जवानाच्या संपर्कातील तो तेथे राहत असलेल्या परिसरातील ९५ व्यक्तींना  आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आले. या सगळ्यांचे थ्रोट स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी  एकूण २८ अहवाल प्राप्त झाले असून, यातील २७ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ...

उदगीर येथील 30 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह, एकाही रुग्णाची वाढ नाही.

Image
उदगीर येथील 30 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह लातूर, दि. 27:- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत आज     दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी उदगीर येथील 30, अंबाजोगाई येथील 2 व या संस्थेतील 1 व्यक्तींच्या स्वॅबची कोरोना (कोविड19) साठी तपासणी  करण्यात आली असून सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ज्या 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत त्या व्यक्तींचे 48 तासानंतर स्वॅब घेवून पुनर्तपासणी करण्यात येणार  आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे   आज दुपारी उदगीर येथील 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते या मध्ये वाढ झाली नाही. ही एक सुखद बातमी आहे. या तीन रुग्णावर उपचार केले जात आहेत.            

उदगीर येथे रूग्णांचे 3 अहवाल पॉझिटिव्ह

Image
उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 26  स्वॅबपैकी 18  अहवाल निगेटिव्ह; तर 3 अहवाल पॉझिटिव्ह * 2 व्यक्तींची पुनर्तपासणी होणार तर 3 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित लातूर, दि. 27:-  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26.04.2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 26 व्यक्ती, चाकुर येथील 1 व्यक्ती व या संस्थेतील 7 असे एकुण 34 कोरोना (कोविड 19) संशयित व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी या संस्थेतील 7 व चाकुर येथील एका व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे या दोन व्यक्तींचे 48 तासानंतर स्वॅब घेवून पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहेत.   आज दिनांक 27.04.2020 रोजी उदगीर येथील 30, अंबाजोगाई येथील 2 व या संस्थेतील 1 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी  प्रक्रिया चालु आहे अशी माहिती  डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख...

कलेक्टर जयवंशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा 

Image
कलेक्टर जयवंशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा   मात्र घरातच राहून नमाज अदा करण्याच्या  दिल्या सूचना हिंगोली -  मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार (ता.२५) पासून सुरू झाला असून पवित्र रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रमजान मुबारक अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा देत रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपआपल्या घरातच राहून नमाज अदा करण्याच्या सूचना मुस्लिम समाज बांधवाना दिल्या आहेत.तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात लॉकडाऊन सुरु आहे. शिवाय कलम 144 लागू असल्याने संचारबंदीचे आदेश आहेत .अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने या काळात रमजान साजरा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना सायंकाळी इफ्तार पार्टी देण्याची परंपरा आहे. सायंकाळची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असतात मात्र सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरासह हिंगोली जिल्ह्यातही लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू आहे. या...

हिंगोलीत आणखी चार जवानांना कोरोनाची लाग

Image
हिंगोलीत आणखी चार जवानांना कोरोनाची लाग कोरोना रुग्ण संख्येत वाढ ,एकूण अकरा जनावर उपचार सुरू हिंगोली : मालेगाव येथील बंदोबस्तावरून परतलेल्या क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आलेल्या चार एसआरपीएफच्या जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी ( ता.२७) प्राप्त झाला असून चार जवानांना कोरोनाची लागण झाल्याने आता रुग्ण संख्येत वाढ होऊन आकारावर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मागील आठवड्यात मालेगाव, मुंबई येथून १९२ जवान कर्तव्य पार पाडून हिंगोलीत परतले होते.याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना मिळताच त्यांनी तातडीने एसआरपीएफ मधील रुग्णालयात सर्व जवानांना कोरंटाइन करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्याचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयकडे पाठविण्यात आले होते. यातील१९४ जवानापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पॉझिटिव्ह निघालेल्या व सोबतच्या जवानांवर उपचार करून कोरंटाईन करताच न करताच तोच पुन्हा जालना येथून हिंगोलीत दाखल झालेल्या हिवरा बेल येथील एका जव...