Posts

Showing posts from February 22, 2020

*हॅप्पी इंडियन व्हिलेजवरील 'हॅप्पी होम' चे नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन.*

Image
* हॅप्पी इंडियन व्हिलेजवरील 'हॅप्पी होम' चे नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन.*     लातूर - हासेगाव येथील हॅप्पी इंडियन व्हिलेज प्रकल्पावर HIV संक्रमित विवाहित जोडप्यांच्या पुनर्वसनासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उदघाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते तथा निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवार दि . २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता  करण्यात येणार आहे .    हँप्पी होमच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार - लेखक अरविंद जगताप हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेवालय आणि हॅप्पी इंडियन व्हिलेजच्या वाटचाली संदर्भातील  ''नोंदी जागवी आठवणी''  या पत्रकार महारुद्र मंगनाळे लिखित व मुक्तरंग प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे .    लातूर पासून जवळच असलेल्या हासेगाव येथे आम्ही सेवक संस्थेच्या वतीने मागील 13 वर्षांपासून एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या मुलांच्या संगोपनासाठी सेवालय आणि  जोडप्यांसाठी  हॅप्पी इंडियन  व्हिलेज  हे दोन प्रकल्प चालविण्यात ...

स्त्री भ्रूणहत्या वर आधारित नाटिकेचे सादरीकरण

Image
स्त्री भ्रूणहत्या वर आधारित नाटिकेचे सादरीकरण हिंगोली - जिल्हा परिषदेच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे तीन दिवसीय आयोजन केले होते. शुक्रवारी औंढा येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूण हत्येवर आधारित माझं अस्तित्व या नाटिकेचे सादरीकरण केले असता ,उपस्थितांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या वतीने महसूल विभागाच्या धर्तीवर तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार संत नामदेव कवायत मैदानावर क्रिकेट, हॉलिबाल, यासह थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, धावणे अश्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा घेण्यात आल्या तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यात सामूहिक गायन, वैयक्तीक गायन, एकपात्री नाटिका, सामूहिक नाटिका अशा स्पर्धा झाल्या. यामध्ये औंढा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोहरा व पिंपळदरी पप्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांनी दिग्दर्शक डॉ. अविनाश गायकवाड , ज्योती बांगर लिखित स्त्री भ्रूण हत्या,माझं अस्तित्व या नाटिकेचे  पीसीपी एनडीटी कायदा१९९६ यावर आधारित जबरदस्त नाटिकेचे सादरीकरण केले आहे.यामध्ये कलाकार म्हण...

नीतीन बानगुडे यांचे मंगळवारी जाहीर व्याख्यान

Image
नीतीन बानगुडे यांचे मंगळवारी जाहीर व्याख्यान नवनाथ व्यायाम शाळा मित्र मंडळाचा पुढाकार हिंगोली - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्तनवनाथ व्यायाम शाळा मित्र मंडळाच्या पुढाकारातून अकोला बायपास येथील शिवनेरी चौक येथे मंगळवारी (ता.२५) सायंकाळी ६.३० वाजता नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान होणार आहे.    या कार्यक्रमाचे उदघाटन कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर हे राहतील. खंडेराव सरनाईक, नगरसेवक राम कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब राऊत, अशोक अर्धापुरकर,गोविंदरावभवर, माजी सरपंच प्रकाश कावरखे, संतोष गोरे,उपसरपंच किरण डहाळे, लक्ष्मण थोरात, डॉ.भुजंग देशमुख, सुरेंद्र ढाले,आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जाहीर व्याख्यानाचा लाभ शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन नवनाथ व्यायाम शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.