Posts

Showing posts from April 17, 2020

पॉझिटिव्ह कोरोना व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त टाळ्यांच्या गजरात व्यक्तीचे स्वागत करून घरी पाठवले

Image
पॉझिटिव्ह कोरोना व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त टाळ्यांच्या गजरात व्यक्तीचे स्वागत करून घरी पाठवले हिंगोली -  येथील सामान्य रुग्णालयात पंधरादिवसापूर्वी संशयित कोरोना व्यक्तीला आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा अहवाल दोन एप्रिलला औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडून प्राप्त होताच तो पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र त्याचे दोन्ही थ्रोट स्वाब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त कडे वाटचाल करीत आहे. शुक्रवारी त्याच्या चाचण्या घेऊन पंधरा दिवसाचा कालावधी संपल्याने त्या व्यक्तीस त्याचा हौसला बुलंद करण्यासाठी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत घरी पाठवले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास यांनी दिली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून यामध्ये व्हेंटिलेटर सह आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये ,जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी  जिल्हा प्रशाशन, आरोग्य विभाग, महसूल विभागाने क...