लातुर - संभाजी नगर 02, हिप्परगा 01, औसा 01, कामखेडा 02, एकूण 06 पॉझेटिव्ह, अहमदपूर 01मृत ,
लातुर - संभाजी नगर 02, हिप्परगा 01, औसा 01, कामखेडा 02, एकूण 06 पॉझिटिव्ह, अहमदपूर 01 मृत * जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण 62, उपचाराने बरे झालेले रुग्ण 77 व मृत्यू झालेले रुग्ण 04 * विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 03.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 02 व्यक्ती रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील असुन त्या 7 दिवसांपूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत. तसेच 01 व्यक्ती औसा तालुक्यातील हिप्परगा येथील असून त्यांनी मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे व 01 व्यक्ती केदार नगर औसा येथील असून ती व्यक्ती सोलापूर येथून प्रवास करून आलेली आहे. कोविड केअर सेंटर लातूर येथून 37 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले...