Posts

Showing posts from March 9, 2020

शहर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा 

Image
     हिंगोली - येथील शहर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित रविवारी (ता.८) सकाळी अकरा वाजता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांचा सत्‍कार करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थीनी देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.        पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर  वेजनै, पोलीस निरीक्षक सय्यद, नितीन केनेकर, मनोजकुमार पांडे,  कांबळे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांची उपस्‍थिती होती.  दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी  उपस्थित महिलांचा सन्मान करुन त्‍यांचा सत्कार केला.

शिरडशहापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्‍यू

शिरडशहापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्‍यू   औंढा नागनाथ - तालुक्यातील शिरडशहापूर येथे एका युवकाला हिटरचा शॉक लागून त्‍यांचा मृत्‍यू झाल्याची घटना सोमवार (ता.९) सकाळी घडली.    या बाबत माहिती अशी की, शिरडशहापूर येथील अकरावी वर्गात शिकणारा जय ज्योती जाधव ( १६) सकाळी सात वाजता अंघोळीसाठी गरम पाणी घेत असताना त्‍याचा इलेक्‍ट्रीक हिटरचा शॉक लागला. लगेच घरच्यांनी त्‍याला  उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. जय हा मुलगा शिक्षणात फार हुशार होता पाचवी ते दहावी पर्यंत तो भावना पब्लिक स्कूल रिसोड येथे शिकत होता. त्यानंतर तो पुढील शिक्षण राजस्थानमध्ये कोटा येथे शिक्षण घेत होता. त्याचे स्वप्न आयएसआय अधिकारी बनण्याचे होते. तो सुट्ट्या असल्यामुळे घरी आला होता.   तसेच तो घरच्यांना एकुलता एक होता ऐन होळीच्या सणाच्या दिवशी युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरील घटनेचा पंचनामा जमादार प्रकाश नेव्हल यांनी केला व  शवविच्छेदन वसमत उपजिल्हा रुग्णालय येथे केल...

विजबिला पोटी दोन महिन्यात ग्राहकाकडून दोन कोटी वसूल

विजबिला पोटी दोन महिन्यात ग्राहकाकडून दोन कोटी वसूल   महावितरणकडून वसुली मोहीम युद्धपातळीवर   हिंगोली - विजवितरण कंपनी कडून फेब्रुवारी अखेर वीज बिलापोटी ग्राहकाकडून दोन कोटी ४९लाख रुपयांची वसुली झाली असून अजूनही युद्धपातळीवर मोहीम सुरु आहे.पथकाने थकबाकी दारांकडे जाऊन वसुली करीत असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक  अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली.   दरम्यान, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून जानेवारी पासून वीज बिलाची वसुली मोहीम सुरू केली आहे. दोन महिन्यात महावितरण कंपनीने वीज बिलापोटी घरगुती, औद्योगिक, पाणीपुरवठा ग्राहकाकडून फेब्रुवारी अखेर दोन कोटी ४९ लाख रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीदाराकडे मोठ्या प्रमाणात रकमा असून पथका मार्फत वसुली केली जात आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागात दोन पथकाची नियुक्ती केली आहे. तर तालुकास्तरावर पथकाकडून वसुली केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.घरगुती ग्राहकाकडून वारंवार सांगून देखील वीजबिलाचा भरणा केला जात नाही अशा ग्राहकांचे मीटर डिस कनेक्ट केले जात आहे.परत वीजबिल भरल्यानंतर जोडणी करून दिल्या जाते.   दरम्यान, घरगुती ग्राहकांची संख...

गंगाखेड शुगर गळीत हंगामाची लगबग सुरू बायलर पेटणार,बँक व कारखाना प्रशासनाची तयारी सुरू.

गंगाखेड शुगर गळीत हंगामाची लगबग सुरू बायलर पेटणार,बँक व कारखाना प्रशासनाची तयारी सुरू. .. गंगाखेडःप्रतिनिधी मराठवाड्यातील सर्वाधिक गाळप क्षमता आसलेला गंगाखेड शुगर अँन्ड एनर्जी कारखानाचा आगामी गाळप हंगाम बँक प्रशासन व कारखाना प्रशासन यांचा वतीने सुरू करण्यात येणार आसून चार दिवसात डिसलरी प्लाँन्ट सुरू करण्यात येणार आहे.वेळेतच गंगाखेड शुगरचे बायलर पेटणार आसल्याचे बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव व कारखान्याचे एमडी राजेंद्र डोंगरे यांनी पञकार परिषदेत स्पष्ट केले आहे. गंगाखेड शुगर अँन्ड एनर्जी चा कार्यालयात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेत बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव कारखान्याचे एमडी राजेंद्र डोंगरे उपस्थित होते यावेळी बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव म्हणाले की एनसीएलटी न्यायालयाचा वतीने गंगाखेड शुगरवर प्रशासक म्हणुन माझी नियुक्ती आसून त्या अधिकारात कामकाज सुरू आहे.परभणी जिल्हातील तथा कारखाना क्षेञातील उस उत्पादक शेतक-यासाठी वरदान आसलेला गंगाखेड शुगर  मागील वर्षाचा दुष्काळी परीस्थितीमूळे व पुरेशा प्रमाणात उस उपलब्ध नसल्याने मागील वर्षी गाळप हंगाम बंद ठेवावा लागला होता.यावर्षी मोठ्...