संत मारोतराव महाराज जन्मशताब्दी सोहळया निमित्त मनपामध्ये बैठक
संत मारोतराव महाराज जन्मशताब्दी सोहळया निमित्त मनपामध्ये बैठक परभणी(प्रतिनिधी)दि.11ः- संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळयानिमित्त महापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर, उप आयुक्त गणपत जाधव, रविंद्र सोनकांबळे, इमरान हुसेन, विनोद कदम, प्रविण गोमचाळे, शहर अभियंता वसीम पठाण, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, मुस्कदीप खान, अल्केज देशमुख, मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या भव्यदिव्य ग्रंथराज भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, आखंड हरिनाम सप्ताह दि. 8 एप्रिल ते 15 एप्रिल संत तुकाराम महाविद्यालय प्रांगणात होणार आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. अच्युत महाराज म्हणाले की, महाराष्ट्रातील 23 जिल्हयातील भक्त येणार आहेत. 60 हजार नागरीक येणार आहेत. यासाठी महानगर पालिकेच्या वतीने पाईपलाईन टाकून 400 नळ देण्यात यावे तसेच स्वच्छता करून देण्यात यावी, आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रोज रक्तदान शिबिर घे...