हिंगोली एकास डिस्चार्ज तर एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली 80 वर
गुरुवारी एका योध्याचा कोरोनावर विजय रुग्ण संख्या पोहचली ३७३ वर हिंगोली - कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील एक रुग्ण गुरुवारी ठणठणीत बरा होऊन घरी परतल्याने त्यास सुट्टी देण्यात आली असून तो डिग्रस येथील आहे. जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यन्त ३७३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजमितीला ८० कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत २२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक, गांधी चौक एक, जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक,पेडगाव एक, शुक्रवार पेठ दोन, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा तीन, दौडगाव दोन, गवळीपुरा एक, पेन्शन पुरा एक, अंधारवाडी एक, सेनगाव एक, जयपूरवाडी एक ,नवा मोंढा हिंगोली एक, कासारवाडा एक, आझम कॉलनी एक यांचा समावेश आहे. तर वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे पाच रुग्ण भरती असून यात जयनगर एक, वापटी एक, शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राट नगर पाच, अशोकनगर एक, गणेशपेठ एक, पारडी...