Posts

Showing posts from July 19, 2020

हिंगोली : संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल

Image
  संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल यंदा ही उज्वल यशाची परंपरा कायम कनेरगाव - हिंगोली तालुक्यातील  कनेरगाव नाका येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल८८ टक्के लागला असून ,मागील वर्षी प्रमाणे यंदाही या महाविद्यालयाने तालुक्यात बाजी मारली असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल लागला असून, या महाविद्यालयातील आदित्य देशमुख हा विद्यार्थी मुलामधून प्रथम आला असून त्याला८८.९०टक्के गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेतून मुली मधून दिशा नीलकंठ गायकवाड हीने८५.०७ टक्के गुण मिळविले आहे. त्यापाठोपाठ आदित्य तळोकर ७६ टक्के ,अनुज मोहिरे ७६टक्के, kumari वल्लापिल एलिझाबेद ७५.८५ टक्के ,धवल बंग ७४.५,कुमारी ममता भागत ६९ टक्के ,प्रकाश खंदारे ७१ टक्के, तर कला शाखेतून ज्योती गावंडे ६५ टक्के गुण,कुमारी वाघमारे प्रतीक्षा ६४ टक्के ,सागर गावडे६१ टक्के ,कुमारी वैशाली डवळे ६० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.  दरम्यान, रविवारी सरस्वती नगर येथे दिशा गायकवाड, आदित्य देशमुख, वल्लपिल एलीझाबेद या गुणवंत  विद्यार्थ्यां...

चिंताजनक ; पुन्हा आणखी नव्याने २३ रुग्णाची भर

चिंताजनक ; पुन्हा आणखी नव्याने २३ रुग्णाची भर तर अकरा रुग्ण कोरोनामुक्त हिंगोली - रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने २३ रुग्णाची भर पडली असून ,अकरा कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली. शहरातील खडकपुरा येथे आज ३४पुरुष,३४,३८,२१,स्त्री तर१५ वर्षीय मुलगी, दहा, व चार वर्षाच्या मुलीला कोरोना संसर्ग झाला असून ते सर्व जण कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. याचप्रमाणे तालाबकट्टा येथील६०,२१स्त्री,३०,३७ पुरुष ,११वर्षाची मुलगी हिला कोरोना बाधा झाली असून हे पण जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच सेनगाव  वॉर्ड क्रमांक एक बालाजी नगर येथील २५,२९,३५ वर्षीय स्त्री हे तिघे जण कोरोना संपर्कातील व्यक्ती आहेत. याशिवाय वसमत येथील स्वानंद कॉलनी येथील ४१ वर्षीय पुरुष यास ताप, सर्दी, खोकला येत असल्याने तपासणी करण्यात आली. आखाडा बाळापूर येथील ५०पुरुष,४६ वर्षीय स्त्री,१४ वर्षीय मुलगी तर कांडली येथील२४,व २३ पुरुषाला बाधा झाली आहे. तसेच पुणे येथून रेडगाव येथे परतलेल्या एका३० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जिल्हा आयसोलेशन...

हिंगोली : राहोलीत शेतकऱ्यांची आत्महत्या

राहोलीत शेतकऱ्यांची आत्महत्या हिंगोली,-  तालुक्यातील  राहोली बुद्रुक येथील एका शेतकऱ्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी  घडली असून या बाबत अकस्मात म्रुत्युची नोंद झाली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील राहोली बुद्रुक येथील विठ्ठल बाबाराव डोरले (वय 40) यांना मालकीची एक एकर शेती असून, एवढ्यावरच कुटुंबाचा गाडा हकने शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी गावातीलच एका व्यक्तीची पाच एकर जमीन बटईने केली. यंदा वेळेतच पाऊस सुरु झाल्याने, खरीप पेरणीचा हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा त्यांना होती.मृग नक्षेत्रात पेरणी आटोपली मात्र बियाणांची उगवणच झाली नाही.  त्यामुळे कशी बसी उसनवारी करून, दुसऱ्या वेळेस ही पेरणी केली तरीही उगवण झालीच नाही.शेतकऱ्याने हार न मानता तिसऱ्यांदा पेरणी केली. मात्र, त्याही बियाण्याची उगवण झालेली नसल्याने, शेतकरी डोरले चांगलेच गोंधळून गेले. मागील काही दिवसांपासून शेतकरी डोरले हे अस्वस्थ होते. अखेर त्यानी घराच्या बाजूला असलेल्या पडक्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डोरले हे घरात न दिसल्याने कुटुंबायांनी  त्यांचा ...