चिंताजनक ; जिल्ह्यात कोरोना बाधितांचे त्रिशतक पार
चिंताजनक ; जिल्ह्यात कोरोना बाधितांचे त्रिशतक पार गुरुवारी नव्याने ६१ रुग्णाची भर तर एकाचा मृत्यु हिंगोल - जिल्ह्यात गुरुवारी नव्याने ६१ रुग्णांची भर पडली असून ,एकाचा कोविडने मृत्यू झाला आहे . आता कोरोनाच्या बाधितांने त्रिशतकी आकडा गाठला असल्याने आरोग्य यंत्रणेला चिंता लागली आहे. गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्ट द्वारे तपासणी केली असता यामध्ये ३६ रुग्ण आढळून आले आहेत. यात हिंगोली परिसर पाच व्यक्ती, कळमनुरी परिसर १७ , वसमत परिसर ५ व्यक्ती,औंढा परिसर तीन, सेनगांव परिसर सहा असे एकुण ३६ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर विठ्ठल नगर वसमत एक व्यक्ती, शास्त्री नगर वसमत एक व्यक्ती, वसमत नगर एक व्यक्ती, जवळा ता. वसमत एक व्यक्ती, असोलेवाडी ता. कळमनुरी एक व्यक्ती आणि सेनगांव शहर दोन व्यक्ती असे एकूण सात रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली शहरातील बियाणी नगरातील एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आरटी पीसीआर टेस्ट द्वारे आढळून आलेल्यात हिंगोली१४,गुगळ पि...