Posts

Showing posts from June 21, 2020

औसा 07, लातूर 01, बाभळगाव ट्रेनिंग सें. 01 एकूण 09 पॉझेटिव्ह

Image
दिनांक 21.06.2020 लातूर 131  पैकी  112 निगेटिव्ह 09 पॉझिटिव्ह 10 Inconclusive विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  02 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेली  व्यक्ती गवळी नगर लातूर येथील  आहे.  पोलीस प्रशिक्षण केंद्र  बाभळगाव येथून 22 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली 78 वर्ष वयाची व्यक्ती अजिंक्य सिटी  येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. तीन रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 27 रुग्ण भरती असून त्यापैकी अतिदक्षता विभागात एकूण 14 रुग्ण असून त्यामध्ये 04 रुग्ण व्हेंटिलेटरव...

कळमनुरी : कुंडलीक असोले यांचा मृतदेह आढळला

  कळमनुरी कुंडलीक असोले यांचा मृतदेह आढळला कळमनुरी -  दोन दिवसापूर्वी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या कुंडलिक असोले यांचा मृतदेह रविवार (ता.२२) सकाळी सहा वाजता पुयना तलावात आढळून आल्यानंतर शोध घेणाऱ्या नागरिकांनी तो पाण्याबाहेर काढला शवविच्छेदन व इतर प्रक्रिया पूर्ण करून दुपारी असोलवाडी या त्यांच्या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवार (ता.19) सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातील  आखाड्यावर बैलगाडी घेऊन निघालेल्या कुंडलिक असोले त्यांची पत्नी धुरपतबाई असोले या रस्त्यात असलेल्या ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेले होते. त्यानंतर परिसरातील  नागरिक व प्रशासनाच्या वतीने ओढ्याच्या व तलावाच्या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. दरम्यान शनिवार (ता.20) सकाळी तलावाच्या परिसरात धुरपतबाई आसोले यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतरही कुंडलिक आसोले यांचा शोध लागला नव्हता दिवसभर शेकडो नागरिकांनी हा परिसर पिंजून काढल्यानंतरही कुंडलिक आसोले आढळून आले नाही. त्यानंतर तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी या प्रकाराची माहिती जिल्‍हा आपत्‍ती कक्षाला दे...