हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी
जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी जिल्हाधिकारी जयवंशी यांची पत्रकार परिषदेत माहिती हिंगोली - शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता ,हा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात सहा ते १९ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसाचा लॉकडाऊन लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील ही दुसरी संचारबंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३) जिल्हाकचेरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जयवंशी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. आता तर लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, उच्य पदस्थ अधिकाऱ्यांनाही कोरोना लागण झाल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्...