Posts

Showing posts from September 28, 2020

मराठा शिवसैनिक सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा मराठा आरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करा

Image
मराठा शिवसैनिक सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा मराठा आरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करा      सेनगाव -  येथे सोमवारी  मराठा शिवसैनिक सेनेतर्फे मराठा आरक्षण व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.   हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसगट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, त्याच बरोबर मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आज मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यात बैलगाड्या घेऊन मराठा शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले.  यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.    

हिंगोलीत नव्याने ४३ रुग्णाची भर   तर  २७ रुग्णांना सुट्टी , दोघांचा मृत्यू

हिंगोलीत नव्याने ४३ रुग्णाची भर   तर  २७ रुग्णांना सुट्टी , दोघांचा मृत्यू   हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी नव्याने  ४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील २४ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर  १९ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. २७  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून दोघांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.   जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणीत  २४  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसरात अकरा ,सेनगाव परिसर आठ,कळमनुरी परिसर पाच , असे एकूण२४ रुग्ण सापडले आहेत, तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १९ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील १८ , सेनगाव  परिसर एक ,कळमनुरी परिसर सात, अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.   तर आज सुमारे २७  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील ११ ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा ४ , कोरोना केअर से...