Posts

Showing posts from October 20, 2020

हिंगोलीत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

हिंगोलीत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती   हिंगोली -  राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील १०६१ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी काढले आहेत. राज्य शासनाने मंगळवारी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठते नुसार पोलीस उपनिरीक्षक २५ टक्के  कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पोलीस अंमलदार म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात नऊ पोलीस अमलदारांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये मुंजाजी गणपतराव वाघमारे, अशोक नामदेवराव कांबळे, विठ्ठल लालू जाधव,प्रकाश गणपतराव आवडे, मोहमद अरिफोद्दीन मोहमद ताजोद्दीन काजी, गंगाराम कचरू बनसोडे, फाक्रोद्दीन सिद्दीकी, उमर शेख, सुभाष आढाव, यांचा पदोन्नती मिळाल्यात समावेश आहे. पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्याना १५ दिवसाचा इंडक्शन कोर्स महाराष्ट्र पोलीस अकडेमी नाशिक येथे आयोजित केला आहे. बासंबा पोलीस ठाण्यातील बनसोडे यांची पोलीस उपन...

झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल” संकल्प अभियानात  सामान्य प्रशासन विभाग अव्वल

झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल” संकल्प अभियानात  सामान्य प्रशासन विभाग अव्वल हिंगोली -  जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या झिरो पेंडंसि अँड डेली डिस्पोजल या अभियानात सामान्य प्रशासन विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग, त्यांचे अतंर्गत कार्यालय, सर्व पंचायत समिती, मध्ये जनतेची व प्रशासकीय कामे विशिष्ट कालमर्यादेत निर्गत करण्याची कार्यालयीन कार्यपध्दती ‘झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल”  चा कार्यक्रम अखंड चालू ठेवण्यासाठी महात्मा गांधी जयंती निमित्त( ता.२) ऑक्टोम्बर पासून संकल्प अभियान राबविन्या बाबत सर्व कार्यालय, सर्व पंचायत समिती, विविध कार्यालयाचे उप विभाग, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी हिरिरिने सहभाग नोंदवून हे अभियान पूर्णत्वास नेण्याबाबत सीईओ आर. बी. शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प अभियान सुरु केले. त्यामुळे या संकल्प अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिरिरिने भाग घेतला घेतला होता. मागील १५ दिवसांपासून कार्यालयीन दिवशी व सुटीच्या दिवशी देखील जिल्हा परिषद व पंचायत समिती...