भयभीत’ २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
भयभीत ’ २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रंगणार ‘ भयभीत ’ करणारा गुंतागुंतीचा खेळ अनिल चौधरी, पुणे गूढ भास आणि अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलीकडे बरंच काही. याच भास-आभासाचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ गोष्टी. आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ याचा अनपेक्षित अनुभव देणारा ‘ भयभीत ’ हा चित्रपट २८ फेब्रुवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे. आईच्या अचानक झालेल्या मृत्यनंतर मानसिक धक्का बसणाऱ्या श्रेयाच्या वागणुकीत रहस्यमयी बदल व्हायला सुरूवात होते. श्रेयाला होणाऱ्या भासामागे नक्की काय गूढ दडलंय? याचा शोध घ...