Posts

Showing posts from July 2, 2020

लातूर 10, उदगीर 03, अहमदपूर 02 एकूण 15 रुग्ण पॉझेटिव्ह

Image
दिनांक 02.07.2020 लातूर  136 पैकी 107 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह 13 Inconclusive लातूर : काळे गल्ली 04, सम्राट चौक 01,  लोखंड गल्ली 01,  lic कॉलनी 01, साळे गल्ली 01 जिल्ह्यात आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 402, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 175, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 213 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19. आज 7 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे . विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 50 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहायक प्राध्यापक डॉ. बालाजी पुरी यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून 65 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 27 रुग्ण दाखल असून 07 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 38 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.  आज तीन रुग्णांना...

लाख येथे धाडसी चोरी ,तीन लाख ९७ हजाराचे दागिने पळविले

लाख येथे धाडसी चोरी ,तीन लाख ९७ हजाराचे दागिने पळविले हिंगोली - औंढा तालुक्यातील लाख येथे ता. एक ते दोन जुलै च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून तीन लाख ९७ हजाराचा ऐवज लाम्बविला असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आल्याने लाख येथे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संजय लोंढे यांच्या लाख येथील राहत्या घरी एक ते दोन जुलै च्या मध्यरात्री ते दुसऱ्या मजल्यावर झोपले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला असता कपाटात ठेवलेले दहा हजार पाचशे रुपयांची सोन्याची दुहेरी मण्याची पोथ, तीन एकदानी सोन्याची प्रत्येकी दहा हजार पाचशे,एक कानातील सोन्याचे झुमके ज्याची किंमत २८००,तीन जोड कानातील सोन्याच्या पत्या ८८००, अकरा ग्राम कानातील तीन सोन्याच्या जोड पत्या ३८५०० ,एक तोला वजनाचा नेकलेस ३५००, साडे तीन तोळ्यांच्या पाटल्या एक लाख पाच हजार पाचशे,दीड तोळ्यांचे सेवन पीस ५२५०, साडे तीन तोल्याच्या गव्हाळ मान्याच्या तीन पोथ एक लाख पाच हजार पाचशे,तीन तोळ्याचे एक गांठण१०,५००,एक एकरा ग्राम सोन्याचे लॉकेट ३८५०,वीस तोळ्याचे पायातील चांदीचे चैन १६००, एक बाजू बंद व...

औंढा क्वारंटाइन सेंटर येथील एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा

Image
  हिंगोली - औंढा नागनाथ येथील क्वारं टाइन केलेल्या एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला आहे. सदर महिला ही भोसी येथील रहिवासी असून कोरोना संक्रमित व्यक्ती सोबत मुंबईवरून परतली आहे. विशेष म्हणजे भोसी गावातील गरोदर महिला जिला कोरोना लागण झाली होती. तिच्या कुटुंबातील व गावातील२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच घोळवा येथील एका७१ वर्षीय वृद्धाचा२८ जुलै रोजी हैद्राबाद येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबातील व गावातील जवळच्या संपर्कातील ३२ जणांचे  थ्रोट नमुने तपासणी साठी पाठविले होते .त्यातील३१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. व एक अहवाल रिजेकट आहे. तो पुन्हा तपासणी साठी पाठविला जाणार आहे. कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत.यातील दोन्ही रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी  दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून एक रुग्ण आढळला आहे. आजघडीला जिल्ह्यात २७७ रुग्ण झाले आहेत.त्यापैकी  २४०  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर एकूण३७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. वसमत येथे ती...

लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील*

वृत्त क्रमांक:-         दि. 2 जुलै 2020 *नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये*  * लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील*          *- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत* लातूर, दि.2(जिमाका):- उद्यापासून लातूर शहरासह जिल्ह्यात लॉक डाउन जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.      यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या आदेशान्वये दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय औषधी दुकाने नियमितपणे सुरू राहतील) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या दिनांक 3 जुलैपासून इतर कोणत्याही प्रकारचा लॉक डाऊन जाहीर केलेला नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व रस्त्यावर गर्दी करू नये व पूर्वीच्याच लॉकडाऊन प्रमाणे नियमितपणे सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत याची दखल दखल घ्यावी व  माज माध्यमे व ...