Posts

Showing posts from June 1, 2020

हिंगोली : विलाज सुरू असताना प्रसुती केली नसल्याची तक्रार

Image
  विलाज सुरू असताना प्रसुती केली नसल्याची तक्रार हिंगोली - शहरातील आझम कॉलनी येथील गर्भवती महिलेला एका रुग्णालयात विलाज सुरू असताना प्रसुतीसाठी नकार दिल्याबद्दल त्‍यांच्यावर दंडात्‍मक कारवाई करावी अशी मागणी जिल्‍हाधिकारी यांच्याकडे सोमवारी (ता.1) करण्यात आली आहे.  या बाबत अशरदखान कलरदखान पठाण यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, माझ्या भावाची पत्‍नी मसरुतजहॉ अमजतखान पठाण या गरोदर असल्याने त्‍यांचा नियमित विलाज शहरातील एका खाजगी रुग्णालयात सुरू होता दर महिण्याला तेथे तपासणी केली जात होती. त्‍यांनतर कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे दवाखान्यात डॉक्‍टराना हजर राहण्याचे शासन आदेश असतानाही त्यांनी माझ्या वहिणीची प्रसुतीची वेळ आल्यानंतर दवाखान्यात भरती केले नाही. त्‍यामुळे या बाबत योग्य ती चौकशी करून संबधीतावर दंडात्‍मक कारवाई करून त्‍यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जनतेस धन्यवाद ! लातूर जिल्यात आजही व कालही एकही कोरोना रुग्ण नाही

Image
लातूर जिल्यात आजही व कालही एकही कोरोना रुग्ण नाही लातुर 57 पैकी 54 निगेटीव्ह  03 Inconclusive विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 01.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.  त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत.  तसेच  28 व्यक्तीं मोती नगर लातूर येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या होत्या.  त्या सर्व 28 व्याक्तीच्या स्वॅबची तपासणी केली असता निकटवर्तीय व संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दिलासादायक बाब आहे.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 13 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  रेणापूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे लातूर जिल्ह्यातून एकूण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हो...

हिंगोली : रुग्ण संख्या पोहचली ७७ वर, मुंबई कनेकशन

Image
मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर हिंगोली -  मुंबई हुन परतलेल्या सतरा वर्षीय पुरुषासह एका बारा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.१)सायंकाळी पाचच्या सुमारास प्राप्त झाला असून,जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ७७ वर पोहचली असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई वरून  सोमवारी परतलेला एक १७ वर्षीय रुग्ण औंढा तालुक्यातील असून त्याच्यावर औंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती केले असून ,त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. तर दुसरीकडे मुंबईहून वसमत येथे परतलेल्या एका१२ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याने तिला वसमत येथील क्वारंटाइन सेंटर मध्ये भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. आतापर्यन्त जिल्ह्यात एकूण १८२ रुग्ण झाले असून त्यापैकी १०५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. तर आजमितीला एकूण ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर कोरोना सेंटर येथे उपचार सुरु असल्याचे जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. जिल्ह्यात मुंबई,पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांची संख्या द...

हिंगोलीत लवकरच होणार कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार

Image
हिंगोलीत लवकरच होणार कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार खासदार राजीव सातव यांचा पुढाकार     हिंगोली - येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरु होणार असून त्यासाठी ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार आहे. पुढील पंधरवड्यात हि मशीन बसणार असून त्यामुळे हिंगोलीकरांची मोठी सोय होणार आहे. खासदार राजीव सातव यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मुंबई, पुणे, नाशीक या सारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्या मजूरांची तसेच गावकऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक तालुक्यात किमान आठ ते दहा हजार मजूर गावात येऊ लागले आहेत. हे सर्व जण टप्प्या टप्प्याने येत असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले, त्यानंतर काही जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर संक्रमण साखळी शोधणे यासाठी मोठा कालावधी लागत आहे. दरम्यान, हिंगोली येथे कोरोना तपासणी लॅब सुरु झाल्यास प्रशासनाला आणखी गतीने काम करणे शक्य होणार आहे. त्यासाठी खासदार  राजीव सातव यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठविले आहे. त्यात हिंगोली येथे लॅब सुरु झाल्यास स्वॅब नमुन्यांचे अहव...