चिंताजनक ; सोमवारी नव्याने ३३ कोरोना पॉझिटिव्ह ,तर १५ रुग्ण कोरोनामुक्त
चिंताजनक ; सोमवारी नव्याने ३३ कोरोना पॉझिटिव्ह ,तर १५ रुग्ण कोरोनामुक्त कही खुशी, कही गम हिंगोली - सोमवारी प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन ३३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १९ रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व १४ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर १५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे हिंगोली परिसर १३,कळमनुरी परिसर चार,आखाडा बाळापूर दोन,असे एकूण१९ रुग्ण अँटीजन तापसणीत आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर द्वारे तपासणी द्वारे आढळून आलेल्यात जिल्हा रुग्णालय एक,गाडीपुरा एक, भोईपुरा एक,जीप वसाहत एक,नरसी नामदेव एक,पिंपळ खुटा एक,कोथळज एक,सेनगाव शहर दोन,कळमनुरी शहर एक,वसमत फाटा एक, वसमत मामा चौक एक,गिरगाव एक अशा एकूण१४ रुग्णाचा समावेश आहे. आज रोजी एकुन १५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त...